TRENDING:

Beed:'आजींना सोनोग्राफीसाठी आणलं अन् नर्सने सेंटर बंद करून निघून गेली' बीड रुग्णालयात प्रकार, VIDEO व्हायरल

Last Updated:

नातेवाईकांनी या परिचारिकेकडे विचारणा केली पण, तिने  नातेवाईकांना उर्मट भाषा वापरली आणि त्या आजीला तसंच सोडून सेंटर बंद करून निघून गेली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बीड : गुन्हेगारांनी बजबजपुरी झालेल्या बीडमध्ये माणसुकीचा काळीमा फासणारी घटना समोर आली आहे.   बीड जिल्हा रुग्णालयात वयोवृद्ध महिलेची सोनोग्राफी करायची सोडून सोनोग्राफी सेंटर बंद केल्याचा प्रकार समोर आली आहे. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सोनोग्राफी तर केली नाही, उर्मट वागणूक केली, असा आरोप नातेवाईकांनी केलाा आहे. या घटनेचा  संतापजनक व्हिडिओ समोर आला आहे.
News18
News18
advertisement

बीड जिल्हा रुग्णालयात वयोवृद्ध आजारी रुग्णांसोबत उर्मटपणाची वागणूक देत चक्क सोनोग्राफी सेंटरचे दार लावून गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल झाला असून यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.

जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी अगोदरच वेळा पाळत नसल्यामुळे रुग्णांमध्ये संताप आहे. त्यातच सोमवारी घडलेल्या प्रकारामुळे जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना माणुसकी हरवली आहे का असा सवाल उपस्थित केला जात आहे. तसंच संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी होते आहे.

advertisement

नेमकं घडलं काय? 

वयोवृद्ध पेशंट आजी तिसऱ्या मजल्यावर ऍडमिट होत्या. डॉक्टरांनी सोनोग्राफी सांगितली होती. जिल्हा रुग्णालयातील लिफ्ट बंद असल्यामुळे तिसऱ्या मजल्यावरून काही सामाजिक कार्यकर्त्यांनी उचलून खाली आणलं. सहा वाजेच्या अगोदर सोनोग्राफी सेंटर समोर आले. मात्र सोनोग्राफी सेंटरमधील  परिचारिकेनं पावणे सहा वाजताच ती महिला समोर झोपलेली असताना सुद्धा तिच्यावर कसल्याही प्रकाराचे लक्ष न देता, पावणे सहा वाजताच सोनोग्राफी सेंटरला बंद केलं.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कोरियन बॅग्सची जोरदार क्रेझ, फक्त 300 रुपयांपासून करा खरेदी,मुंबई हे आहे मार्केट
सर्व पहा

नातेवाईकांनी या परिचारिकेकडे विचारणा केली पण, तिने  नातेवाईकांना उर्मट भाषा वापरली आणि त्या आजीला तसंच सोडून सेंटर बंद करून निघून गेली. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, या प्रकरणात आपण चौकशी केली असून कर्तव्यात कसूर करणाऱ्या परिचारिकेसह डॉक्टरची चौकशी करून कारवाई केली जाईल, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक सतीशकुमार सोळंके यांनी दिली.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Beed:'आजींना सोनोग्राफीसाठी आणलं अन् नर्सने सेंटर बंद करून निघून गेली' बीड रुग्णालयात प्रकार, VIDEO व्हायरल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल