मुंबईतील दादर परिसरात अशाच एका स्टॉलवर केवळ 300 रुपयांपासून कोरियन बॅग्जची विक्री सुरू आहे. दादर वेस्टमधील डिसिल्व्हा रोडवरील कीर्तीकर मार्केटमध्ये, विसावा हॉटेलच्या शेजारी हा स्टॉल असून येथे रोज मोठ्या प्रमाणात ग्राहकांची गर्दी पाहायला मिळते. कॉलेज तरुण-तरुणींसह ऑफिसला जाणारे युवक, ट्रॅव्हलप्रेमी आणि फॅशनप्रेमी ग्राहक या स्टॉलवर आवर्जून भेट देत आहेत.
advertisement
या ठिकाणी रोजच्या वापरासाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या बॅग्ज उपलब्ध आहेत. कॉलेजसाठी उपयुक्त असणाऱ्या स्लिंग बॅग्ज, साइड बॅग्ज, ट्रेंडिंग बॅकपॅक तसेच मोठ्या क्षमतेच्या बॅकपॅक्सचा येथे समावेश आहे. कोरियन साइड बॅग्ज केवळ 300 रुपयांना, 250 रुपयांची कोरियन स्लिंग बॅग, ट्रेंडिंग बॅकपॅक 300 रुपयांना तर मोठी आणि मजबूत बॅकपॅक 700 रुपयांना उपलब्ध आहे. एवढ्या कमी किमतीत ट्रेंडी आणि आकर्षक बॅग्ज मिळत असल्याने ग्राहक समाधान व्यक्त करत आहेत.
या बॅग्जचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे रंग, डिझाइन आणि फिनिशिंग. पेस्टल शेड्स, सॉलिड कलर्स, मिनिमल डिझाइन आणि आधुनिक पॅटर्न यामुळे या बॅग्ज तरुणांच्या फॅशनशी सहज जुळतात. शिवाय हलक्या वजनामुळे या बॅग्ज वापरण्यास सोयीस्कर असून टिकाऊपणाही चांगला आहे असे विक्रेत्यांकडून सांगण्यात येते. परवडणारी किंमत आणि उत्तम गुणवत्ता यामुळे दादरमधील या कोरियन बॅग्जच्या स्टॉलला चांगला प्रतिसाद मिळत आहे.





