Health Tips : फॅट डायट केल्यामुळे खरंच वजन कमी होतं का? काय होतात शरिरावर परिणाम, आहार तज्ज्ञांचा सल्ला

Last Updated:

आजकाल वजन कमी करण्यासाठी आपल्यापैकी अनेकजण वेगवेगळ्या प्रकारचे डायट करतात. यामध्ये कोणी सोशल मीडियावरती बघून, कोणी नुसतं वॉटर फास्टिंग करतं तर कोणी सेलिब्रिटीचे डायट फॉलो करतात.

+
News18

News18

छत्रपती संभाजीनगर : आजकाल वजन कमी करण्यासाठी आपल्यापैकी अनेकजण वेगवेगळ्या प्रकारचे डायट करतात. यामध्ये कोणी सोशल मीडियावरती बघून, कोणी नुसतं वॉटर फास्टिंग करतं तर कोणी सेलिब्रिटीचे डायट फॉलो करतात. त्यासोबत कोणी दिवसातून फक्त एकदा जेवणाचा डायट फॉलो करतो. अशा वेगवेगळ्या प्रकारचे डायट अनेकजण वजन कमी करण्यासाठी फॉलो करत असतात. पण हे जे सर्व डायट आहेत, याला फॅड डायट म्हणतात. म्हणजेच की या डायटमध्ये कितपत सत्य असते किंवा याचा फायदा होतो की होत नाही, याविषयी माहिती आहार तज्ज्ञ प्राची डेकाटे यांनी सांगितलेली आहे.
वेगवेगळ्या प्रकारचे फॅड डायट मार्केटमध्ये आहेत. ओमॅड डाएट, किटो डायट, दिवेकर डायट, दीक्षित डायट, वॉटर फास्टिंग, बुलेट कॉफी काही जण फक्त ज्युसेसवरती राहायला सांगतात. हे सगळे ट्रेंडिंग डायट असतात. यांचा एक ट्रेंड येतो आणि जातो. कारण की हे सायंटिफिकली डाएट नाहीत. आजकाल सगळ्यात जास्त ट्रेंडिंग ओमॅड डायट आहे. ओमॅड डाएट म्हणजे दिवसातून फक्त एकच मिल घ्यायची. म्हणजेच दिवसभरामध्ये फक्त एकच वेळेस जेवण करायचं.
advertisement
‎लोकांना अशी चुकीची माहिती आहे की हेच डायट आपण केलं तर आपलं लगेच वजन कमी होईल पण असं नाही. तुम्ही जर आठ दिवस डायट केलं तर तुमचं वजन कमी होतं आणि जर तुम्ही परत हे डायट बंद केलं तर तुमचं परत वजन वाढू शकतं. त्यासोबतच कीटो डायट देखील खूप ट्रेंडिंग आहे. हे सुद्धा एक फॅड डायटचा प्रकार आहे. या डायटमध्ये असं असतं की फॅटचं प्रमाण खूप असतं.
advertisement
प्रोटीन थोड्या मात्रांमध्ये असतं आणि कार्बोहायड्रेट खूप कमी असतात. अजून हे डायट सुरू झालं होतं, हा ज्यांना मेंदूचे विकार आहेत त्यांच्याकरता सुरू झालं होतं पण आजकाल कोणीही सुद्धा हे डायट करत आहेत आणि हे करणं चुकीचं आहे. जर तुम्ही किटो डायट केलं तर तुमच्या शरीराची आवश्यक पोषक तत्त्वे असतात ते खूप कमी होतात.
advertisement
काही लोक सांगतात की जर तुम्ही फक्त सॅलड खाल्लं तर तुमचं वजन कमी होईल, तुमची स्किन ग्लो करेल. काहीजण सांगतात फक्त अमुक अमुक ज्यूस प्या. तुमचं वजन कमी होईल. तुम्हाला काही दिवसाचा फरक दिसेल पण नंतर परत जशास तसे होऊ शकतं. असे डायट करणं सस्टेनेबल नाही आहे. आपल्या शरीराला सर्व प्रकारचे पोषक घटक भेटणं आवश्यक आहे. यामध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट, मिनरल्स हे सर्व घटक भेटले पाहिजेत. जर तुम्हाला डायट करायचा असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा किंवा तज्ज्ञ आहार तज्ज्ञ आहेत, त्यांचा सल्ला घ्यावा आणि त्यानुसारच आपलं डायट करावं.
advertisement
तुम्ही सोशल मीडियावरती बघून किंवा कुठल्या सेलिब्रिटीचा डायट फॉलो करू नये नाहीतर याचा वाईट परिणाम देखील तुमच्यावरती होऊ शकतो, असं आहार तज्ज्ञांनी सांगितलं आहे.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Health Tips : फॅट डायट केल्यामुळे खरंच वजन कमी होतं का? काय होतात शरिरावर परिणाम, आहार तज्ज्ञांचा सल्ला
Next Article
advertisement
BMC Mayor BJP List: भाजपच्या ४९ महिला बीएमसीमध्ये, महापौरपदासाठी या आहेत तगड्या दावेदार, कोणाची नावे चर्चेत, पाहा यादी..
भाजपच्या ४९ महिला बीएमसीमध्ये, महापौरपदासाठी या आहेत तगड्या दावेदार, कोणाची नावे
  • मुंबईवर यंदा भाजप आपला झेंडा फडकवण्यासाठी सज्ज झाली आहे.

  • आरक्षण 'सर्वसाधारण महिला' प्रवर्गासाठी निघाल्याने भाजपमधील महिला नगरसेविकांमध्ये

  • भाजपच्या ४९ महिला उमेदवारांनी विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे

View All
advertisement