आल्याच्या आवकेत सुधारणा
राज्याच्या मार्केटमध्ये आज एकूण 2733 क्विंटल आल्याची आवक झाली. यापैकी मुंबई मार्केटमध्ये सर्वाधिक 1206 क्विंटल आल्याची आवक झाली. त्यास प्रतीनुसार 4000 ते 5600 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. तसेच चंद्रपूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 18 क्विंटल आल्यास 6000 रुपये सर्वाधिक सर्वसाधारण बाजारभाव मिळाला.
Weather Alert : महाराष्ट्रात अचानक बदलली हवा, आता येणार नवसंकट, हवामान खात्याकडून अलर्ट
advertisement
शेवग्याचे दर स्थिर
राज्याच्या मार्केटमध्ये आज एकूण 274 क्विंटल शेवग्याची आवक झाली. यापैकी मुंबई मार्केटमध्ये सर्वाधिक 125 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 6000 ते 10000 रुपये दरम्यान बाजारभाव मिळाला. तसेच सोलापूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 5 क्विंटल शेवग्यास 13000 रुपये सर्वात जास्त बाजारभाव मिळाला.
डाळिंबाच्या दरात चढ-उतार
आज राज्याच्या मार्केटमध्ये 1402 क्विंटल डाळिंबाची एकूण आवक झाली. यापैकी 1012 क्विंटल सर्वाधिक आवक मुंबई मार्केटमध्ये राहिली. त्यास सर्वसाधारण 10000 ते 15000 रुपये दरम्यान सर्वाधिक बाजारभाव मिळाला. तसेच नाशिक मार्केटमध्ये आवक झालेल्या 21 क्विंटल डाळिंबास 5000 रुपये सर्वात कमी बाजारभाव मिळाला.





