APMC Market Rate: डाळिंबाचं मार्केट कोलमडलं, सर्वात कमी भाव; इतर फळांचे दर किती?
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
बुधवार, दिनांक 21 जानेवारी 2026 रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ. आज आपण महत्त्वाच्या तीन शेतमालांमध्ये आले, शेवगा आणि डाळिंबाची आवक व भाव पाहू.
मुंबई: बुधवार, दिनांक 21 जानेवारी 2026 रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ. आज आपण महत्त्वाच्या तीन शेतमालांमध्ये आले, शेवगा आणि डाळिंबाची आवक व भाव पाहू.
आल्याचे आवक: राज्याच्या मार्केटमध्ये आज एकूण 3159 क्विंटल आल्याची आवक झाली. यापैकी मुंबई मार्केटमध्ये सर्वाधिक 1203 क्विंटल आल्याची आवक झाली. त्यास प्रतीनुसार 3800 ते 6600 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. तसेच नागपूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 629 क्विंटल आल्यास प्रतीनुसार 6423 रुपये दरम्यान सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
शेवग्याचे दर स्थिर: राज्याच्या मार्केटमध्ये आज एकूण 274 क्विंटल शेवग्याची आवक झाली. यापैकी मुंबई मार्केटमध्ये सर्वाधिक 125 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 6000 ते 10000 रुपये दरम्यान बाजारभाव मिळाला. तसेच सोलापूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 5 क्विंटल शेवग्यास 13000 रुपये सर्वात जास्त बाजारभाव मिळाला.
advertisement
डाळिंबाच्या दरात चढ-उतार: आज राज्याच्या मार्केटमध्ये 2082 क्विंटल डाळिंबाची एकूण आवक झाली. यापैकी 843 क्विंटल सर्वाधिक आवक नागपूर मार्केटमध्ये राहिली. त्यास सर्वसाधारण 2000 ते 6000 रुपये दरम्यान बाजारभाव मिळाला. तसेच मुंबई मार्केटमध्ये आवक झालेल्या 842 क्विंटल डाळिंबास 12500 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
Location :
Maharashtra
First Published :
Jan 21, 2026 9:10 PM IST






