याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आज (30 सप्टेंबर) सकाळी 7 वाजून 47 मिनिटांनी सुटलेल्या डोंबिवली ते सीएसएमटी स्लो लोकलमध्ये एका महिला प्रवाशाचा मोबाईल फोन सिटच्या गॅपमध्ये अडकला. खूप वेळ प्रयत्न करून फोन काढता आला नाही. त्यानंतर आरपीएफ अधिकाऱ्यांना मदतीसाठी कॉल करण्यात आला. ही लोकल सीएसएमटीला पोहोचताच महिलेच्या मदतीसाठी स्टाफ पाठवण्यात आला.
Mumbai Local: प्रवासी सुरक्षेसाठी मध्य रेल्वेचा मेगाप्लॅन! या दिवशी नवीन रुपात धावणार नॉन-एसी लोकल
advertisement
स्टाफने प्रयत्न करूनही मोबाईल बाहेर काढता आला नाही. यानंतर, ती लोकल पुन्हा डोंबिवलीच्या दिशेने मार्गस्थ झाली. डोंबिवलीत आल्यानंतर आरपीएफ आणि इतर कर्मचाऱ्यांनी पुन्हा मोबाईल काढण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, त्यांना यश आलं नाही. अखेर याबाबत डोंबिवली स्टेशन मास्तरकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. संबंधित लोकल ट्रेन रात्री कारशेडमध्ये गेल्यानंतर सिटच्या गॅपमधील वेल्डिंग काढून मोबाईल बाहेर काढण्याचं आश्वासन संबधित महिलेला देण्यात आलं आहे.
सकाळी किंवा संध्याकाळी गर्दीच्या वेळी लोकलमध्ये उभं राहण्यासाठी देखील जागा नसते. अशा वेळी अनेकदा मोबाईलसारख्या किमती गोष्टी खाली पडण्याच्या किंवा हरवण्याच्या घटना घडतात. धावत्या लोकलमधूनही मोबाईल खाली पडल्याच्या घटना घडलेल्या आहेत.