Mumbai Local: प्रवासी सुरक्षेसाठी मध्य रेल्वेचा मेगाप्लॅन! या दिवशी नवीन रुपात धावणार नॉन-एसी लोकल

Last Updated:

Mumbai Local: मुंब्रा येथील दुर्घटनेनंतर रेल्वे प्रवासाच्या सुरक्षेविषयी अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Mumbai Local: प्रवासी सुरक्षेसाठी मध्य रेल्वेचा मेगाप्लॅन! या दिवशी नवीन रुपात धावणार नॉन-एसी लोकल
Mumbai Local: प्रवासी सुरक्षेसाठी मध्य रेल्वेचा मेगाप्लॅन! या दिवशी नवीन रुपात धावणार नॉन-एसी लोकल
मुंबई: गेल्या काही दिवसांमध्ये लोकलमधून पडून प्रवाशांचे मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. 9 जून 2025 रोजी मुंब्रा येथे झालेल्या भीषण अपघातामध्ये तर एकाच वेळी अनेकांना आपला जीव गमवावा लागला. लोकलमधून पडून होणाऱ्या अपघातांच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मध्य रेल्वेने एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. साध्या लोकलला देखील एसी लोकलप्रमाणे ऑटोमॅटिक दरवाजे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या डिसेंबरपर्यंत मुंबईकरांना ऑटोमॅटिक दरवाजे असलेली पहिली नॉन-एसी लोकलने प्रवास करण्याची संधी मिळू शकते.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वेने कुर्ला कारशेडमध्ये सामान्य लोकलसाठी 'ऑटोमॅटिक दरवाज्यांचा' पहिला प्रोटोटाइप कोच तयार केला आहे. 29 सप्टेंबर रोजी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी कुर्ला कारशेडमध्ये जाऊन या प्रोटोटाइप रेकची तपासणी केली. दरवाजे उघडून आणि बंद करून प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं. त्यासाठी मोटरमनच्या केबिनमधून कमांड देण्यात आले. प्रोटोटाइपची कारशेडमध्ये चाचणी घेण्याची ही तिसरी वेळ होती.
advertisement
मुंब्रा येथील दुर्घटनेनंतर रेल्वे प्रवासाच्या सुरक्षेविषयी अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे, असे मत अनेकांनी व्यक्त केले होते. मुंबई आणि उपनगरांतील प्रचंड गर्दीमुळे दररोज 1 ते 2 प्रवासी लोकलमधून पडून जीव गमवात आहेत. विशेषत: ठाणे-डोंबिवली मार्गावरील अपघातांचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने सर्वसामान्य लोकलमध्येही ऑटोमॅटिक दरवाजे बसवण्याचा निर्णय घेतला आहे.
advertisement
सध्या धावणाऱ्या सर्व लोकल गाड्यांना आणि नवीन गाड्यांना दरवाजे बसवले जाणार आहेत. मात्र, अनेकजणांच्या मते, लोकलचे दरवाजे बंद असतील तर व्हेंटिलेशनची समस्या निर्माण होऊ शकते. शिवाय, गर्दीच्या काळात गोंधळ उडण्याचाही शक्यता आहे. याशिवाय 238 नवीन एसी लोकल गाड्यांसाठी टेंडरही काढण्यात आलं आहे.
काही दिवसांपूर्वी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव बुलेट ट्रेन प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी घणसोली येथे आले होते. तेव्हा त्यांनी देखील बंद दरवाज्यांसह लोकल ट्रेन चालवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं म्हटलं होतं.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Mumbai Local: प्रवासी सुरक्षेसाठी मध्य रेल्वेचा मेगाप्लॅन! या दिवशी नवीन रुपात धावणार नॉन-एसी लोकल
Next Article
advertisement
Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement