Google Map Mistake: गुगल मॅपने गंडवलं अन् पुरात आणून सोडलं, 7 प्रवाशांची सुखरुप सुटका
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Google Map Mistake: गुगल मॅपमुळे अनोळखी रस्त्यांवरून देखील प्रवास सोपा झाला आहे. परंतु, याच गुगल मॅपमुळे फसगत झाल्याचा प्रकार भिवंडीतून पुढे आला आहे.
भिवंडी: सध्या माहिती नसलेल्या रस्त्याने जाताना बहुतेक जण गुगल मॅपचाच आधार घेतात. मात्र, याच तंत्रज्ञानाने काहींची फसगत झाल्याचे प्रकारही पुढे येतात. आता असाच प्रकार भिवंडीत घडला आहे. गुगल मॅपमुळे चुकीच्या रस्त्याने जाऊन दोन कार अडकून पडल्याची घटना घडलीये. रविवारी बापगाव-सोनाळे रस्त्यावर साचलेल्या पाण्यात दोन कार प्रवासी घेऊन गेल्या. अखेर भिवंडी महसूल विभाग आणि अग्निशमन दलाच्या प्रयत्नाने कारमधील प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली.
नाशिकहून दोन ओलाने भांडुपला काही प्रवासी निघाले होते. आमणे येथे गुगल मॅपवर त्यांना बापगाव सोनाळे मार्गे रस्ता दाखवण्यात आला. त्यामुळे ते त्याच मार्गाने पुढे जात राहिले. या रोडवर मौजे लोनाड, चौधरी पाडा येथे एपीएक्स कंपनीजवळच्या रस्त्यावर या दोन्ही कार अडकून पडल्या. या कारमध्ये एक महिला, दोन पुरुष आणि दोन मुली असे 5 प्रवासी आणि 2 चालक होते.
advertisement
याबाबत जिल्हा आपत्कालीन कक्षाकडून माहिती मिळाली. तेव्हा तहसीलदार अभिजित खोले यांच्या मार्गदर्शनात पडघा मंडळ अधिकारी संतोष आगिवले, तलाठी चित्रा विशे हे भिवंडी अग्निशमन दलाच्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बोटीच्या मदतीने कारमधील प्रवासी, चालकांची सुखरूप सुटका केली आणि संबंधित प्रवाशांना कुटुंबासह सुरक्षित घरी पाठविले.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
September 30, 2025 8:39 AM IST
मराठी बातम्या/Viral/
Google Map Mistake: गुगल मॅपने गंडवलं अन् पुरात आणून सोडलं, 7 प्रवाशांची सुखरुप सुटका