advertisement

Akola: भाजपने शरद पवार गटाला घेतलं सोबत, सत्ता करणार स्थापन? अकोल्याच्या राजकारणात खळबळ

Last Updated:

राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार असल्याची बातमी खरी ठरली तर सत्तेचं नवीन समीकरण तयार होणार आहे. 

News18
News18
अकोला: महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर आता महापौर कोण होणार याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे. राज्यात अनेक ठिकाणी युती आणि आघाडी करून सत्ता स्थापन करण्यासाठी कसरत सुरू आहे. अशातच अकोला महापालिकेमध्ये भाजपने आता राष्ट्रवादी शरद पवार गटाला सोबत घेऊन बहुमताचा आकडा गाठला आहे. भाजपच्या या खेळीमुळे अकोल्यात खळबळ उडाली आहे.
अकोला महापालिकेमध्ये महापौरपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. अकोला पालिकेत एकूण ८० जागांसाठी निवडणूक पार पडली. बहुमतासाठी ४१ जागा जागांची गरज आहे. वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसने ४२ जागा असल्याचा दावा केला होता. पण आता भाजपने राष्ट्रवादी शरद पवार गटाला सोबत घेतलं आहे. भाजपचे ३८ नगरसेवक, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ३, अजित पवार गट १,  शिंदे गट १ आणि अपक्षाला सोबत घेऊन ४४ जागांचा आकडा गाठला असल्याचा दावा भाजपचे आमदार रणधीर सावरकर यांनी केला आहे. 44 नगरसेवकांचे पत्र देण्यात आल्याचंही सावरकर यांनी माहिती दिली आहे.
advertisement
अकोल्यात भाजपची सत्ता येणार?
राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार असल्याची बातमी खरी ठरली तर सत्तेचं नवीन समीकरण तयार होणार आहे.  तर दुसरीकडे काग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने सुद्धा आपल्याकडे 42 नगरसेवक असल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीने सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. पण आता, दोन्ही गटाने दावे केल्यामुळे कुणाची सत्ता स्थापन होणार,यामुळे  अकोल्यातील राजकारण तापलं आहे.
advertisement
अकोला महापालिका निवडणुकीत पक्षीय बलाबल एकूण ८० जागा
भाजप- ३८
काँग्रेस - २१
ठाकरे गट - ०६
वंचित बहुजन आघाडी - ०५
एमआयएम - ०३
शरद पवार गट -०३
शिवसेना शिंदे गट- ०१
राष्ट्रवादी अजित पवार गट - ०१
इतर / अपक्ष०२
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Akola: भाजपने शरद पवार गटाला घेतलं सोबत, सत्ता करणार स्थापन? अकोल्याच्या राजकारणात खळबळ
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement