शिवसेनेत असतानाही बाळा नांदगावकर यांची ओळख राज ठाकरे यांची कट्टर समर्थक अशी होती. ज्यावेळी उद्धव ठाकरे यांच्याशी वैर घेऊन राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला त्यावेळी त्यांच्यासोबतच बाळा नांदगावकर यांनीही शिवसेना सोडली. थेट बाळासाहेब ठाकरे यांना भेटून शिवसेना शाखेच्या किल्ल्या देऊ केल्या. परंतु काही वर्षांनी दोन भावांनी एकत्र आले पाहिजे, असा सूम उमटायला लागल्यानंतर त्यांच्या एकत्रिकरणासाठी नांदगावकर यांनी मनोमन प्रयत्न केले. अखेर हिंदीसक्तीच्या विरोधात आणि मराठी भाषेच्या सन्मानासाठी दोन ठाकरे बंधू महापालिका निवडणुकांसाठी एकत्र आल्याने नांदगावकर यांचे स्वप्न साकार झाले. मात्र नांदगावकर यांची अनुपस्थिती सर्वांना खटकत होती. परंतु त्यांचे तब्येत ठीक नसल्याने आज ते पत्रकार परिषदेस उपस्थित नव्हते.
advertisement
बाळा नांदगावकरांची तब्येत बिघडली?
मुंबई महानगरपालिकेसाठी ठाकरे बंधू एकत्र यावे यासाठी बाळा नांदगावकर सुरूवातीपासून प्रयत्न करत होते. युतीच्या चर्चेच्या प्रत्येक बैठकीसाठी बाळा नांदगावकर उपस्थित होते. मात्र परवा रात्रीच्या बैठकीनंतर बाळा नांदगावकर यांची तब्बेत बिघडली आहे. त्यांना घशामध्ये इन्फेक्शन झाले आहे. त्यामुळे काल देखील बैठकीला नव्हते आणि आज देखील पत्रकार परिषदेसाठी उपस्थित होते.
राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
राज ठाकरे यांनी मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीची घोषणा केली. आज शिवसेना आणि मनसेची युती झाली, हे मी जाहीर करतो, असं राज ठाकरे म्हणाले. कुठल्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. कोण किती जागा लढवणार , हे आता सांगणार नाही, असंही राज ठाकरेंनी सांगितले. मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच होणार, असा विश्वासही राज ठाकरेंनी व्यक्त केला.
हे ही वाचा :
