याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वेने कुर्ला कारशेडमध्ये सामान्य लोकलसाठी 'ऑटोमॅटिक दरवाज्यांचा' पहिला प्रोटोटाइप कोच तयार केला आहे. 29 सप्टेंबर रोजी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी कुर्ला कारशेडमध्ये जाऊन या प्रोटोटाइप रेकची तपासणी केली. दरवाजे उघडून आणि बंद करून प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं. त्यासाठी मोटरमनच्या केबिनमधून कमांड देण्यात आले. प्रोटोटाइपची कारशेडमध्ये चाचणी घेण्याची ही तिसरी वेळ होती.
advertisement
Google Map Mistake: गुगल मॅपने गंडवलं अन् पुरात आणून सोडलं, 7 प्रवाशांची सुखरुप सुटका
मुंब्रा येथील दुर्घटनेनंतर रेल्वे प्रवासाच्या सुरक्षेविषयी अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे, असे मत अनेकांनी व्यक्त केले होते. मुंबई आणि उपनगरांतील प्रचंड गर्दीमुळे दररोज 1 ते 2 प्रवासी लोकलमधून पडून जीव गमवात आहेत. विशेषत: ठाणे-डोंबिवली मार्गावरील अपघातांचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने सर्वसामान्य लोकलमध्येही ऑटोमॅटिक दरवाजे बसवण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या धावणाऱ्या सर्व लोकल गाड्यांना आणि नवीन गाड्यांना दरवाजे बसवले जाणार आहेत. मात्र, अनेकजणांच्या मते, लोकलचे दरवाजे बंद असतील तर व्हेंटिलेशनची समस्या निर्माण होऊ शकते. शिवाय, गर्दीच्या काळात गोंधळ उडण्याचाही शक्यता आहे. याशिवाय 238 नवीन एसी लोकल गाड्यांसाठी टेंडरही काढण्यात आलं आहे.
काही दिवसांपूर्वी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव बुलेट ट्रेन प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी घणसोली येथे आले होते. तेव्हा त्यांनी देखील बंद दरवाज्यांसह लोकल ट्रेन चालवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं म्हटलं होतं.