काँग्रेसचे माजी आमदार सुभाष झांबड अझिंठा अर्बन बॅँकेचे अध्यक्ष असून बॅकेमधील 98 कोटी 48 लाख व 21 कोटी रूपयाच्या घोटाळा प्रकरणात त्यांच्यावर सीटीचौक पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. पहिला गुन्हा हा ऑक्टोबर 2023 मध्ये दाखल असून दुसरा गुन्हा हा नोव्हेंबर 2024 मध्ये नोंदवण्यात आला आहे.
दरम्यान पहिला गुन्हा दाखल झाल्यापासून सुभाष झांबड अटकपूर्व जामीनासाठी प्रयत्न करत आहेत. यापुर्वी जिल्हा व सत्र न्यायालय आणि औरंगबाद खंडपीठात झांबड यांचा अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळण्यात आला होता. त्यानंतर झांबड यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. तेथे त्याच्या अर्जाच्या सुनावणीच्या वेळी झांबड पोलिसांसमोर हजर झाले आणि पुन्हा जामीनासाठी अर्ज केल्यास त्यावर न्यायालयाने तत्काळ निर्णय घ्यावा,असे आदेश देण्यात आले आहेत.
advertisement
दरम्यान पहिला गुन्हा दाखल झाल्यापासून सुभाष झांबड अटकपूर्व जामीनासाठी प्रयत्न करत आहेत. यापुर्वी जिल्हा व सत्र न्यायालय आणि औरंगबाद खंडपीठात झांबड यांचा अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळण्यात आला होता.
