गडचिरोली जिह्यात पूल नसलेल्या नाल्याला पूर आल्यानं मृतदेह खाटेवर ठेवून भरलेल्या नाल्यातून गावी अंत्यसंस्कारासाठी न्यावं लागल्याचा प्रकार घडलाय. भामरागड तालुक्यातील लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत गुंडेनुर येथील 50 वर्षीय काटिया करिया पुंगाटी हे आजारी पडल्यानं त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान हा त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांना घरी नेण्यासाठी नातेवाईकांना मोठ्या अडचणीला तोंड द्यावं लागलं.
advertisement
रुग्णालयापासून गुंडेनुरनाल्या पर्यंत सदर शव ट्रॅक्टर ने नेण्यात आलं. गुंडेनूर नाल्यावर पुल नसल्यानं काही नातेवाईकांनी मृतदेह खाटेवर ठेवून
ती खाट आपल्या खांद्यावर घेऊन नाला पार केला. याचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे.
दरम्यान, समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, नदी आलांडण्यासाठी पूल नाही. त्यामुळे नातेवाईकांनी मृतदेह खाटेवर ठेवून नदी पार केली. हे दृश्य पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
