कुठे मिळाला जीवंत बॉम्ब
कोटगुलपासुन 500 मीटर अंतरावर असलेल्या डोंगराच्या पायथ्याजवळ गोंडरी जंगल परिसराकडे जाणाऱ्या पायवाटेवर माओवाद्यांनी पोलीस पथकांला नुकसान पोहचवून मोठा घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणात स्फोटके आणि इतर साहित्य पेरून ठेवली होती. बॉम्ब शोधक पथकाने विविध अत्याधुनिक उपकरणाद्वारे जंगल परिसरात सर्चिंग करत पाहणी केली. त्यावेळी अंदाजे दीड ते दोन फुट खोल जमिनीमध्ये स्फोटक पदार्थ भरुन असलेले प्रेशर कुकर मिळून आले. त्याची बिडीडीएस पथकाकडुन एक्सप्लोझिव्ह किटने तपासणी केली असता, त्यामध्ये अंदाजे 2 किलो उच्च स्फोटके आढळली. स्फोटक पदार्थ घटनास्थळावरचं नष्ट करण्यात आले.
advertisement
वाचा - 'बाळाचा बाप कोण?' 15 वर्षांच्या मातेला विचारलं तिने जे सांगितलं, डॉक्टरांच्या डोळ्यात आलं पाणी
पोलीस महासंचालक गडचिरोलीत
राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला शनिवारी गडचिरोलीच्या अतिदुर्गम छत्तीसगड सीमेवरील गर्देवाडा भागात पोहोचल्या. यावेळी त्यांनी येथे उभारण्यात आलेल्या नवीन पोलीस ठाणे परिसराची पाहणी केली. एक ते दीड महिन्यापूर्वी येथे एका दिवसांमध्ये जिल्हा पोलीस दलाने नव्या पोलीस ठाण्याची निर्मिती केली होती. या पोलीस ठाण्याच्या परिसराची पोलीस महासंचालक शुक्ला यांनी पाहणी करून नक्षल समस्येचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासोबत राज्य गुप्त वार्ता विभागाचे आयुक्त शिरीष जैन, नक्षलसेल गडचिरोली परिक्षेत्राचे आयजी संदीप पाटील डीआयजी अंकित गोयल उपस्थित होते. दरम्यान, भविष्यातही नागरिकांचे असेच सहकार्य राहिले तर नक्षलवाद पूर्णपणे संपवू, असा विश्वास पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी व्यक्त केला.
