crime news : 'बाळाचा बाप कोण?' 15 वर्षांच्या मातेला विचारलं तिने जे सांगितलं, डॉक्टरांच्या डोळ्यात आलं पाणी
- Published by:sachin Salve
- trending desk
Last Updated:
हॉस्पिटल प्रशासनाने तातडीने या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये येऊन सर्वांचे जबाब नोंदवले. त्या पीडित मुलीशी संवाद साधल्यानंतर तिने अखेर आरोपीचं नाव हॉस्पिटलला सांगितलं.
सीधी : मध्य प्रदेशातल्या सीधी जिल्ह्यात एका घटनेमुळे खळबळ उडाली आहे. तिथल्या 15 वर्षांच्या एका अल्पवयीन मुलीने एका बाळाला जन्म दिला आहे. त्या मुलीवर आधी कोणी तरी बलात्कार केला. नंतर त्या व्यक्तीने तिच्याशी लग्न करण्यासही नकार दिला. तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, तेव्हा तिथे त्या नवजात बाळाच्या वडिलांचं नाव विचारण्यात आलं. पीडित मुलीने आपल्या बाळाच्या वडिलांचं नाव सांगितलं नाही, तेव्हा तिथे गोंधळ उडाला. हॉस्पिटल प्रशासनाने तातडीने या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये येऊन सर्वांचे जबाब नोंदवले. त्या पीडित मुलीशी संवाद साधल्यानंतर तिने अखेर आरोपीचं नाव हॉस्पिटलला सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी आरोपीविरोधात केस दाखल केली आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
सीधी जिल्हा पोलिसांना जिल्हा रुग्णालयातून अशी माहिती मिळाली, की 15 वर्षांच्या एका तरुणीने बाळाला जन्म दिला आहे आणि ती त्या बाळाच्या वडिलांचं नाव सांगायला नकार देत आहे. तिचे नातेवाईकही काही सांगायला तयार नव्हते. ही माहिती मिळताच पोलीस तातडीने तिथे दाखल झाले. पोलिसांनी पीडित मुलीच्या कुटुंबीयांकडे या प्रकाराबद्दल चौकशी केली. तेव्हा त्यांनी मुलगी गर्भवती होण्यापासून तिला मूल होईपर्यंतची सारी कहाणी सांगितली. त्यानंतर पोलिसांनी मुलीचा जबाबही नोंदवला.
advertisement
त्या पीडित मुलीने पोलिसांना सांगितलं, की सुमारे वर्षभरापूर्वी तिची एका व्यक्तीशी ओळख झाली होती. आरोपीने नऊ महिन्यांपूर्वी तिच्यावर बलात्कार केला होता. काही महिन्यांनी जेव्हा शरीरात बदल होऊ लागले, तेव्हा तिला कळलं की ती गर्भवती आहे. त्यानंतर तिने जेव्हा त्याच्याकडे लग्नाचा विषय काढला, तेव्हा त्याने साफ नकार दिला. पीडिता म्हणाली, की तिने त्याच्यापुढे बऱ्याच विनवण्या करूनही त्याने तिचं म्हणणं ऐकलं नाही.
advertisement
पीडितेने त्या आरोपी तरुणाचं नाव पोलिसांना सांगितलं आहे. त्यानंतर पोलिसांनी औपचारिकता पूर्ण करण्यासाठी हॉस्पिटलला नवजात बाळाच्या वडिलांचं नाव सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी आरोपीविरोधात अनेक संबंधित कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
Location :
Madhya Pradesh
First Published :
Feb 19, 2024 7:34 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
crime news : 'बाळाचा बाप कोण?' 15 वर्षांच्या मातेला विचारलं तिने जे सांगितलं, डॉक्टरांच्या डोळ्यात आलं पाणी









