पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर जिल्ह्यातील घोडेगाव परिसरात ही घटना घडली. संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. दोन गटांमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने अहिल्यानगर येथील साईदीप हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. मात्र, उपचारादरम्यान दोन्ही गटांकडून हॉस्पिटल परिसरातही परस्पर मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
घटनेनंतर साईदीप हॉस्पिटल परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गोळीबार नेमका कशामुळे झाला, याचा तपास पोलीस करत आहेत. ही घटना गँगवार मधून घडली असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
(सविस्तर बातमी लवकरच)
Location :
Ahmadnagar,Maharashtra
First Published :
Feb 12, 2026 8:23 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अहिल्यानगरमध्ये गँगवारचा भडका, गोळीबारात एकाचा मृत्यू, हॉस्पिटलमध्येही मारामारी
