जालन्याहून निघालेलं भगवं वादळ अखेरीस मुंबईत धडकलं. मुंबईतील आझाद मैदानात मोठ्या संख्येनं मराठा बांधव एकवटले आहे. हे पाहून गुणरत्न सदावर्ते यांनी पत्रकार परिषद घेऊन मनोज जरांगे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.
'मला आज महत्त्वाचा विषयावर बोलणार आहे. मुंबईच्या व्यवसायास कसा थांबवला जात आहे. आजची तारीख जी त्यांनी निवडली ती चुकीची होती. हे आंदोलन जे सुरू आहे ते कायदाच्या सीमा तोडली जात आहे. कायदेशीर दृष्टा कारवाई झाली पाहिजे
advertisement
त्यामुळे आम्ही आझाद मैदान, पोलीस आयुक्त यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. नव्याने नियम आहेत, जे मनोज जरांगे यांना देण्यात आले होते ते ही पाळत नाही.' जरांगे कायदा पेक्षा मोठे नाही. मुंबई ही आर्थिक राजधानी आहे. याची बदनामी व्हावी. देशात काही तरी भयंकर आहे हे दाखवं म्हणून CST ला जो रस्ता रोखतो करण्यात आला का? असा सवालही सदावर्तेंनी केला.
मनोज जरांगेचा फक्त मुखोटा आहे. राजकारण यातून दिसत आहे. उद्धव ठाकरे मुंबईत लोक राहत नाहीत का? गणेश भक्त मुंबईत राहत नाही. उद्धव तुम्ही व्यक्त कसे झालात? तुमचे लोक प्रतिनिधी मंचावर का जातात. तुमचा यामध्ये हात आहे का? आता तुम्ही सत्य बोला. 'शरद पवार गटाचे आमदार तिथे येऊन त्यांचा कानात बोलता. लोकांना एकला जाऊ नाही. खासदार बजरंग सोनावणे असो किंवा संजय क्षीरसागर त्या आंदोलनात मिरवतात. किती गाड्या कोणी दिल्या, लोक कशी जमली, मग आता शरद पवार यांनी सांगितलं पाहिजे' अशी टीकाही सदावर्तेंनी केली.
'आम्ही उच्च न्याल्यात मागणी केली होती की मनोज जरांगे यांना आंदोलनाची परवानगी देऊ नका. त्या निवेदनामध्ये आजचे दिसले त्यातले मुद्दे आम्ही टाकले होते. जरांगे यांच्या आंदोलनात सकाळी ९ ते संध्याकाळी ६ पर्यंतची वेळ आहे. तरीही जरांगे हे कायदेला चॅलेंज कसे करू शकतात, लोकांना वेठीस धरू नका. आम्ही पुन्हा तक्रार केली आहे की जरांगे यांच्यावर कारवाई का नाही करावी.
अनेक ठिकाणी वाहतुकीची समस्या दिसून येत आहे.
मनोज जरांगे यांच्या विरोधात FIR दाखल केला पाहिजे. जे लोक त्यांना समर्थन करतात. त्यांच्यावर ही कारवाई झाली पाहिजे
उद्धव ठाकरे, बजंरग सोनावणे यांच्यावर ही कारवाई झाली पाहिजे. गणेश भक्तांना जी लोक त्रास देतात, त्यांच्यावर ही कारवाई ही झाली पाहिजे. त्यांना ६ वाजल्यानंतर आंदोलन करताना उठवलं पाहिजे. सगळ्यांनी चुकीचा आंदोलनाचा निषेध केला पाहिजे.
संविधान विरोधात जे कोणही सामिल होत असेल हे चुकीचं आहे . संविधान विरोधी अंदोलन आहे आणि मी त्यांना अटक करण्याची मागणी करतो आहे आणि मी कायदा पकडून बोलत आहे. जरांगे तुम्हाला मी सांगतो आहे, तुम्हाला ही बाकी आंदोलनकर्त्यासारखं उठवावं लागेल. कायदा सगळ्यांसाठी एक आहे आणि न्याय पण तसाचं असला पाहिजे. पोलिस भरतीचे विद्यार्थी ही तिथे बसले आहेत आणि त्यांना का उठवलं पाहिजे.
'मुख्यमंत्री एका जातीचा नाही आहे. ते सगळ्यांचे मुख्यमंत्री आहेत. अश्या प्रकारचा निर्णय होऊ शकतो का. तुमची मागणी आणि जीआर निघू शकत नाही आणि कायदा समोर उभे राहू शकत नाही. मराठा आणि कुणबी एकत्र येऊ शकत नाही. आंदोलनाला पैसे कुठून येतात. जर तुम्ही बाकी लोकांचा तपास करतात. मग आता यांचा पण करा, अशी मागणीही सदावर्तेंनी केली.