TRENDING:

बॉयफ्रेंड एक अन् त्या दोघी, पोरींनी असं काही केलं; गोंदिया पोलिसांनी डोक्याला लावला हात

Last Updated:

बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी चक्क मुलींनी दुचाकीची चोरी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
रवी सपाटे, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

गोंदिया :  फेब्रुवारी महिना म्हणजे प्रेमाचा महिना. हा महिना खास प्रेमीयुगुलांसाठी आहे. प्रेमी युगुल असो किंवा नवविवाहित जोडपं, प्रत्येकजण या आठवड्यात वेगवेगळे दिवस साजरे करतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे किशोरवयीन मुलामुलींमध्ये या विषयी प्रचंड आकर्षण असते. आपल्या मनतील भावना आपल्या आवडत्या एकमेकांना व्यक्त करण्यासाठी जोडपे व्हॅलेंटाईन वीक निवडतात. मात्र ती इतरांपेक्षा हटके आणि स्पेशल करण्याच्या नादात कधी कधी मुलांकडून चुकीचे पाऊल उचलल जाते. अशीच एक घटना गोंदियातून समोर आली आहे. प्रपोज डे ला बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी चक्क मुलींनी दुचाकीची चोरी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

advertisement

समोर आलेल्या माहितीनुसार, गोंदिया शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सिंधी कॉलनी परिसरात राहणाऱ्या गोपालदास मुरझानी यांच्या घरासमोरून दोन मुलींनी दुचाकी चोरली. सकाळी 10.30 वाजता चक्क दोन मुलींनी आपल्या बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी दुचाकी चोरली. दुचाकी चोरण्याऱ्या दोन्ही मुलींनी अगोदर परिसरात पायी फिरत रेकी केली .रेकी केल्यानंतर चक्क काही वेळातच गाडी चालू करून गाडी चोरली

advertisement

दोन्ही मुली पोलिसांच्या ताब्यात

दुचाकी चोरीला गेल्याची याची तक्रार गोपालदास मुरझानी यांनी गोंदिया शहर पोलिसात केली. शहर पोलिसांनी दोन्ही मुलींना ताब्यात घेतले असून गाडीही जप्त केली आहे. तर पुढील तपास गोंदिया शहर पोलीस स्टेशन करत आहे. विशेष म्हणजे दोन्ही मुली या विधी संघर्ष बालिका आहेत.

फेब्रुवारी महिन्यात जर तुम्ही देखील कोणाकडे तरी प्रेम व्यक्त करण्यासाठी आतुर असाल, तर तुमच्यासाठीही व्हॅलेंटाइन वीक ही योग्य संधी आहे. परंतु काही तरी हटके करण्याच्या नादात चुकीचे पाऊल उचलले जाते, अशा अनेक घटना समोर आल्या आहेत,

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
बॉयफ्रेंड एक अन् त्या दोघी, पोरींनी असं काही केलं; गोंदिया पोलिसांनी डोक्याला लावला हात
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल