TRENDING:

कारवाई करायला गेलेल्या महिला प्रांताधिकाऱ्यावर वाळू माफियांचा हल्ला

Last Updated:

कारवाई करायला गेलेल्या महिला प्रांताधिकाऱ्यावर वाळू माफियाने हल्ला केला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात पोलिस व महसूल प्रशासनाकडून वाळू तस्करांवर कारवाई करण्यात येत असली, तरी वाळू चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यातच काही राजकीय वरदहस्तामुळे आता वाळू तस्करांचे मनोबल वाढले आहे. देवरीच्या उपविभागीय अधिकारी कविता गायकवाड या कारवाई करीत असताना एका वाळू तस्कराने त्यांच्यावर हल्ला करून जखमी केले.
महिला प्रांताधिकाऱ्यावर वाळू माफियांचा हल्ला
महिला प्रांताधिकाऱ्यावर वाळू माफियांचा हल्ला
advertisement

देवरीच्या उपविभागीय अधिकारी कविता गायकवाड यांनी अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी दौऱ्यावर होत्या. आमगाव तालुक्यातील कट्टीपार येथे त्यांनी टिप्पर अडवून पाहणी केली असता टिप्परचालक लोकचंद राजाराम मेश्राम हा विनापरवाना वाळू वाहतूक करीत असल्याचे आढळले.

यावेळी पुढील कारवाईसाठी टिप्परचालकाला टिप्परसह आमगाव तहसील कार्यालयात घेऊन जात असताना आरोपी ओम श्यामलाल गौतम याने आपले वाहन रस्त्यावर आडवे करून शासकीस कामात अडथळा निर्माण केला आणि गायकवाड यांच्यावर हल्ला करून धक्काबुक्की करीत धमकी दिली.

advertisement

याप्रकरणी आमगाव पोलिसांनी लोकचंद राजाराम मेश्राम व ओम श्यामलाल गौतम या दोघांनाही अटक करून त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 132, 126 (2), 233, 351 (2), 303 (3), 301(1) 3(5) या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास आमगाव पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक तिरुपती राणे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. या प्रकरणी आमगाव पोलिसांनी गुन्हा नोंद करून दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
कारवाई करायला गेलेल्या महिला प्रांताधिकाऱ्यावर वाळू माफियांचा हल्ला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल