राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे गोंदियामध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आले होते. त्यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, बाबा सिद्धी प्रकरण अत्यंत दुर्दैवी आहे. बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण जे घडलं ते अत्यंत दुर्दैवी अशी घटना आहे. बाबा सिद्दिकी यांच्यासोबत मागील अनेक वर्षांपासून माझी मैत्री होती. त्यांच्याशी माझे घनिष्ठ संबंध होते.
advertisement
बाबा सिद्दिकी प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणात आणखी तपास सुरू आहे. या प्रकरणातील अनेक धागेदोरे हळूहळू समोर येत आहे. पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. पोलिसांच्या तपासात समोर येणारे अनेक खुलासे आपण स्वत: करणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी...
राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांची शनिवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. घटनेने एकच खळबळ उडाली. पोलिसांनी या घटनेच्या काही वेळेत दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या. आता या प्रकरणात आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई गँगने स्वीकारली आहे. सोशल मीडियावर एका पोस्टच्या माध्यमातून त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली आहे. मात्र, ही पोस्ट बिश्नोई गँगची असल्याच्या दाव्याला अधिकृत दुजोरा मिळाला नाही..
बाबा सिद्धीकी यांच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. करनैल सिंह (हरियाणा), धर्मराज कश्यप (उत्तर प्रदेश) अशी या दोन्ही आरोपींची नावे आहेत. तर, तिसऱ्या आरोपीची ओळख पटली आहे. बाबा सिद्धिकी यांच्यावर गोळीबार करण्यासाठी तिन्ही आरोपी हे रिक्षाने घटनास्थळी आले.
