पाचव्या टप्प्यात मोठ्या प्रमाणावर देश वाचवण्यासाठी आणि संविधान वाचवण्यासाठी लोक महाविकासाला मतदान करणार आहेत. मी स्वतः विविध सामाजिक संघटनेच्या लोकांशी भेटलो आहे. त्यांची कोणती अशा प्रकारची भूमिका नाही. कुणी अशा प्रकारच्या अफवा पसरवीत असेल तर मला माहित नाही, असे नाना पटोले म्हणाले.
राजकीय प्रश्नापेक्षा शेतकरी, आरोग्य आणि बेरोजगारीचे प्रश्न महत्त्वाचे : नाना पटोले
advertisement
छगन भुजबळ यांनी गौप्यस्फोट केला होता की जर मी त्यावेळेस शरद पवार यांच्यासोबत गेलो नसतो तर काँग्रेसमध्ये असतो तर कदाचित मी मुख्यमंत्री झालो असतो. यावर बोलताना काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले म्हणाले की जर तरला राजकारणामध्ये कोणतेही स्थान नसते. त्यामुळे ते काय बोलले याला काही महत्त्व नाही. काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे की आज देशामध्ये अनेक प्रश्न आहेत. 267 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. आरोग्य व्यवस्थेच्या बोजवारा उडालेला आहे. देशांमध्ये गरिबांचे अन्नधान्यासाठी अनेक प्रश्न आहेत, रोजगाराचे प्रश्न आहेत. हे प्रश्न काँग्रेसला महत्त्वपूर्ण आहेत. फालतूच्या राजकीय चर्चेपेक्षा काँग्रेस यांना महत्त्व देते, असा टोला त्यांनी छगन भुजबळ यांना लगावला.
वाचा - पाचव्या टप्प्यातील मतदानाआधीच नाना पटोले यांचा मोठा दावा; भाजपला महाराष्ट्रातून..
पाचव्या टप्प्यात महाविकास आघाडीला भरभरून मतदान करतील : नाना पटोले
महाराष्ट्रामध्ये पाचव्या टप्प्यातील मतदान उद्या होत असून यात 13 लोकसभेच्या जागांवर मतदान होणार आहे, याविषयी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की गेल्या चार टप्प्यांमध्ये मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीला लोकांनी कौल दिला आणि या पाचव्या टप्प्यातही मी सर्व लोकसभा क्षेत्र फिरलो. लोक मोठ्या प्रमाणात पाठिंबा देऊन महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजय करतील अशी अपेक्षा त्यांनी गोंदिया येथील सडक अर्जुन येथे व्यक्त केली आहे.
