Maharashtra Loksabha Election : पाचव्या टप्प्यातील मतदानाआधीच नाना पटोले यांचा मोठा दावा; भाजपला महाराष्ट्रातून..

Last Updated:

Lok Sabha Elections Phase 5 : लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी पाचव्या टप्प्यातील मतदान होणार आहे. याआधीच काँग्रेस नेते नाना पटोले यांनी मोठा दावा केला आहे.

काँग्रेस नेते नाना पटोले
काँग्रेस नेते नाना पटोले
नागपूर : राज्यात उद्या सोमवारी लोकसभेसाठी पाचव्या टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये 11 लोकसभा मतदारसंघात मतदान होत असून मुंबईतील सर्वाधिक 6 जागांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्या शेवटच्या टप्प्यात मतदान होत आहे. मतदानात महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिसेल. भाजपला महाराष्ट्रातूनच महाराष्ट्र मुक्त करण्याचं शेतकरी, गोरगरिबांनी ठरवलेलं आहे, असं वक्तव्य नाना पटोले यांनी केलं आहे.
काय म्हणाले नाना पटोले?
पटोले म्हणाले, या निवडणुकांमध्ये सत्तेतील भाजपने मागील 10 वर्षात विकास केला असा आव आणण्याचा प्रयत्न केला. पण विकास न केल्यामुळे ते सांगण्यात अपयशी ठरले. भ्रष्टाचार, तानाशाह व्यवस्था केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर, बेरोजगारी शेतकऱ्यांवरील अन्याय यावर ना देशाचे पंतप्रधान बोलले ना राज्याचे मुख्यमंत्री. नरेंद्र मोदी यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला, शाह आले, योगी आले, पण त्यांचा प्रभाव दिसून आला नाही. रोड शोच्या नावाने नरेंद्र मोदी यांनी मुंबईला वेठीस धरण्याचा काम केलं. गुजरातवरुन लोक आणावे लागली. उद्या शेवटच्या टप्प्यात मतदान होत आहे. महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिसेल, असा दावा नाना पटोले यांनी केला आहे.
advertisement
पवार कुटुंबात आम्हाला पडायचं नाही : पटोले
राष्ट्रवादीच्या साठगाठमध्ये आम्हाला पडायचं नाही. 2004 मध्ये सर्वाधिक जागा मिळून अजित पवार नवखे असल्याचं शरद पवार म्हणाले. आम्हाला तानाशहा भाजपला शक्यतो बाहेर काढणे एवढं आमचं उद्दिष्ट आहे. त्यामुळे शरद पवार किंवा अजित पवार काय बोलतात? आम्हाला त्यात पडायचं नाही. महाराष्ट्राला अधोगतिकडे नेण्याचे काम भाजपने केलय. यशवंतराव चव्हाण यांचा महाराष्ट्र पुनरस्थापित करण्याचे काँग्रेसचे उद्दिष्ट असल्याचे पटोले यांनी सांगितले.
advertisement
अकोला हे सॅम्पल ठरणार आहे, चार जूनच्या निकालातून राज्यातील जनतेच्या मनात काय हे लक्षात येईल. आता कोण काय बोलतोय याकडे लक्ष द्यायची गरज नाही. आमचे नेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितलं आहे. मोठं परिवर्तन पाहायला मिळेल.
advertisement
मागील 10 वर्षात काय दिले यावर बोलत नाही. भगवे कपडे घालून मोदींचे गुण गात असतील तर तो एक प्रकारे त्या भगव्या वस्त्रांचा अपमान असल्याची टीका नाना पटोले यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर केली. देशभरातील अनेक पक्षांचं काँग्रेसमध्ये विलनीकरणाचा प्रस्ताव हायकमांडकडे आहे, हे पुण्यातील सभेत त्यांनी सांगितलं. ही प्रक्रिया सुरू राहील, असंही पटोले म्हणाले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नागपूर/
Maharashtra Loksabha Election : पाचव्या टप्प्यातील मतदानाआधीच नाना पटोले यांचा मोठा दावा; भाजपला महाराष्ट्रातून..
Next Article
advertisement
BMC Election Results MIM : बीएमसीमध्ये ८ जागा जिंकल्यानंतर एमआयएमला मोठा जॅकपॉट, मुंबईच्या सत्ता समीकरणात उलटफेर
बीएमसीमध्ये ८ जागा जिंकल्यानंतर एमआयएमला मोठा जॅकपॉट, मुंबईच्या सत्ता समीकरणात उ
  • मुंबई महापालिकेची सत्ता भाजप-महायुतीने हिसकावली आहे.

  • एमआयएमने लक्षणीय कामगिरी करत मुंबईत ८ जागांवर विजय मिळवला.

  • मुंबईतील निवडणुकीतील या यशानंतर आता एमआयएमला मोठा जॅकपॉट लागला आहे.

View All
advertisement