ॲड गुणरत्न सदावर्ते यांनी न्यूज 18 लोकमतशी बातचीत केली आहे. यावेळी त्यांनी महायुतीच्या शपथविधीवर आणि फडणवीस सरकारवर भाष्य केले आहे. कालच्या मुंबईच्या आझाद मैदानावर पार पडलेल्या शपथविधीने 3 गोष्टी अधोरेखीत केल्या. पहिलं म्हणजे, शरद पवार आणि उद्धव ठाकरेला गेट आउट केलंय. तर दुसरं देवेंद्र जी मुख्यमंत्री झालेत.आणि तिसरं म्हणजे प्रत्येक महाराष्ट्रातील संविधान प्रेमी नागरिकांसाठी कालचा दिवस सोन्याचा दिवस झाला, असे सदावर्तेंनी म्हटले.
advertisement
गुणरत्न सदावर्ते यांनी पुढे महाविकास आणि महायुती सरकारमधील फरक देखील सांगितला. संविधानाच्या पुस्तकाची अवहेलना करणारे महाविकास आघाडीवाले होते. मी देवेंद्र जींना विचारलं तुमचं म्हणणं काय? ज्यांनी तुम्हाला त्रास दिला. ते म्हणाले मी माफ केलं. महाविकास आघाडीला जातीय दंगे हवे असतात. हे महाराष्ट्रने पाहिलेलं सत्य. 17 दिवसांच कारागृह. महाविकास आघाडीला जनतेने हाकललं आहे,अशी टीका सदावर्ते यांनी केली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले नरेंद्र मोदी आणि ते स्वतः हे दोघेही म्हणतात धर्मापेक्षा संविधान महत्वाच मानतात. देवेंद्र जी हे कष्टकरांच्या मनातील आहेत. त्यांचे कुटुंब देशभर आहे. दुबईमध्ये आनंद व्यक्त केल जात आहे,असे कौतुक देखील सदावर्तें यांनी यावेळी केले. त्याचसोबत सदावर्तेंनी जरागेंवर मोठ्या प्रमाणावर टीका देखील केली आहे. ए जरांग्या, फाटक्या तुला महाराष्ट्राने नाकारलंय. शिस्तीत राहा,असा सल्ला देखील त्यांना दिला आहे.
