TRENDING:

Shivaji Maharaj: संतापजनक! वॉशरूमच्या दरवाजावर शिवरायांचा फोटो, हरियाणातील रिसॉर्टमधील धक्कादायक प्रकार

Last Updated:

Shivaji Maharaj : हरियाणातील सिकरी येथील एका रिसॉर्टमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी पद्मिनी यांच्या प्रतिमांचा अत्यंत संतापजनक अवमान झाल्याचा प्रकार उजेडात आला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सिकरी: हरियाणातील सिकरी येथील एका रिसॉर्टमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी पद्मिनी यांच्या प्रतिमांचा अत्यंत संतापजनक अवमान झाल्याचा प्रकार उजेडात आला आहे. रिसॉर्टमधील वॉशरूमच्या प्रवेशद्वारावर या महापुरुषांचे फोटो लावण्यात आल्याने देशभरातील शिवप्रेमींमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर झालेल्या प्रक्षोभामुळे अखेर रिसॉर्ट मालकाने हे फोटो काढून माफी मागण्याचा प्रयत्न केला आहे.
संतापजनक! वॉशरूमच्या दरवाजावर शिवरायांचा फोटो, हरियाणातील रिसॉर्टमधील धक्कादायक प्रकार
संतापजनक! वॉशरूमच्या दरवाजावर शिवरायांचा फोटो, हरियाणातील रिसॉर्टमधील धक्कादायक प्रकार
advertisement

> नेमका प्रकार काय?

मिळालेल्या माहितीनुसार, हरियाणाच्या सिकरी येथील मथुरा रोडवरील मिलन रिसॉर्ट'मध्ये हा प्रकार घडला. येथील बँक्वेट हॉलमध्ये असलेल्या पुरुषांच्या वॉशरूमच्या दरवाजावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो, तर महिलांच्या वॉशरूमच्या दरवाजावर राणी पद्मिनी यांचा फोटो लावण्यात आला होता. रिसॉर्टमध्ये आलेल्या एका सजग व्यक्तीने हा प्रकार कॅमेऱ्यात कैद केला आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडिओ वाऱ्यासारखा पसरल्यानंतर नेटिझन्सनी संताप व्यक्त करत, "महापुरुषांचा असा अपमान सहन केला जाणार नाही," असा इशारा रिसॉर्ट प्रशासनाला दिला.

advertisement

advertisement

> वादानंतर माघार

व्हिडिओ व्हायरल होताच शिवप्रेमी आणि विविध संघटनांनी या प्रकाराचा तीव्र निषेध नोंदवला. वाढता दबाव आणि संताप पाहता, रिसॉर्ट चालकांनी तातडीने दोन्ही फोटो तेथून हटवले आहेत. धक्कादायक म्हणजे, शिवराय आणि राणी पद्मिनी यांच्या प्रतिमा काढून त्या ठिकाणी आता घोड्यांचे फोटो लावण्यात आले आहेत.

हे रिसॉर्ट नवीन वशिष्ठ आणि प्रदीप वशिष्ठ यांच्या मालकीचे असल्याचे सांगितले जात आहे, मात्र याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. प्रदीप वशिष्ठ हे या रिसॉर्टचे माजी संचालक असल्याचेही बोलले जात आहे.

advertisement

> शिवप्रेमींमध्ये असंतोष कायम

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मका पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव? कसं कराल व्यवस्थापन, सोप्या टिप्सचा Video
सर्व पहा

फोटो काढले असले तरी, इतका मोठा अवमान होईपर्यंत प्रशासनाचे लक्ष कसे गेले नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याप्रकरणी रिसॉर्ट मालकावर कडक कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Shivaji Maharaj: संतापजनक! वॉशरूमच्या दरवाजावर शिवरायांचा फोटो, हरियाणातील रिसॉर्टमधील धक्कादायक प्रकार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल