बीड : "महादेव मुंडे यांची हत्या केल्यानंतर त्यांच्या माने जवळील मांसाचा तुकडा मारेकरी गोट्या गितेनं वाल्मिक कराड याला दाखवला आणि तो तुकडा आठ दिवस मारेकरी लोकांना दाखवत धाक दाखवत फिरत होते', अशी धक्कादायक माहिती बाळा बांगर यांनी न्यूज18 लोकमतशी बोलताना सांगितली.
महादेव मुंडे प्रकरणी अजूनही न्याय मिळाला नाही. एकीकडे त्यांची पत्नी या प्रकरणी न्याय मागत आहे. तर दुसरीकडे या प्रकरणी कुणालाही चीड येईल अशी संतापजनक माहिती समोर आली आहे. बाळासाहेब बांगर यांच्याशी न्यूज१८ लोकमतच्या प्रतिनिधीने संवाद साधला. यावेळी त्यांनी धक्कादायक असा खुलासा केला आहे.
advertisement
"१००० टक्के खरं आहे, महादेव मुंडे यांचं शवविच्छेदन झालं त्यामध्ये त्यांच्या मानेवर धारदार शस्त्राने वार केले होते. त्यांच्या मानेजवळ असलेल्या मासाचा तुकडा हा मिसिंग होता. हे शवविच्छेदन अहवालातही स्पष्ट झालं आहे. वाल्मिक कराडच्या सांगण्यावर गोट्या गितेनं हत्या केली होती. महादेव मुंडेंची हत्या केल्यानंतर एका पिशवीमध्ये महादेव मुंडे यांच्या मानेजवळील मासाचा तुकडा घेऊन फिरत होता. तो मासाचा तुकडा सात आठ दिवस घेऊ फिरत असल्यामुळे वाळला होता. लोकांमध्ये दशहत निर्माण करण्यासाठी ते तो करत होता' असा खुलासा बांगर यांनी केली.
लोकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी हे कृत्य होतं. पोलीस प्रशासनाला हाताशी घेऊन गोट्या गिते दहशत करत होता. पोलिसांना महादेव मुंडे यांच्या हत्येचा प्रत्यक्षदर्शी कोण होता हे माहित होतं. पण तरीही त्यांनी काही केलं नाही. प्रत्यक्षदर्शीची नंतर हत्या करण्यात आली. वाल्मिक कराडने नंतर पोस्टमार्टमचे रिपोर्ट बदलले. तत्कालीन पोलिसांनी प्रत्यक्षदर्शीला चौकशीला बोलावलं होतं. पण वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून पोलिसांनी प्रत्यक्षदर्शीवर दबाव टाकला होता. तो प्रत्यक्षदर्शी दोन तीन महिनेत फिरत होता, वाल्मिक कराड आणि त्याच्या मुलाचा यामध्ये हात आहे असं सांगत होता. त्यानंतर त्याचा छळ केला, नंतर त्याला मारून टाकलं, त्याला इंजेक्शन देऊन आजारी पाडलं, असंही बांगर यांनी सांगितलं.
