पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात ही घटना घडली आहे. सतीश उर्फ आप्पा दादासाहेब दडस असं हत्या झालेल्या २७ वर्षीय तरुणाचं नाव आहे. सतीश हा फलटण तालुक्यातील सोमंथळी गावात राहणारा होता. सतीश हा १४ जानेवारीपासून बेपत्ता होता. या प्रकरणी सतीश बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आली होती. पण तरीही सतीशचा कुठेही ठावठिकाणा लागत नव्हता. तक्रारदार सागर यालाा त्याच्या मालकाने माहिती दिली. आरोपी लखन बंडू बुधावले आणि सतीश तुकाराम माने या दोघांनी मारहाण केली होती.
advertisement
भांडणातून सतीशच्या डोक्यात घातला लोखंडी रॉड
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असता धक्कादायक माहिती समोर आली, मकरसंक्रांतीच्या दिवशी दुपारच्या सुमारास मयत सतीश दडस आणि त्याच्यासोबत काम करणारे आरोपी लखन बुधावले आणि सतीश माने याच्यासोबत भांडण झालं होतं. भांडणातून सतीशच्या प्रेयसीच्या नवऱ्याने डोक्यात लोखंडी रॉड घातला. त्यामुळे तो जागेवरच कोसळला.
मुंडक, हात आणि शरिराचे केले तुकडे
आरोपींनी पुढे सतीशला दवाखान्यात घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. पण विडणी इथं मांगोबामाळ परिसरात नेलं. तिथून भिवरकवाडीला घेऊन गेले. तिथे गेल्यावर सतीशच्या डोक्यात दगडाने प्रहार करून निर्घृणपणे खून केला. सतीश मेल्यानंतरही मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्लॅन रचला. त्याच्या हत्येच्या वेळी लखन बुधवाले, सतीश माने आणि प्रेयसी महिला सामील होती. तिघांनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी लाकूड कापण्याच्या मशीनने सतीशचे मुंडके, खांद्यापासून हात आणि गुडघ्यापासून पाय कापले. त्यानंतर वेगवेगळे तुकडे करून एका पोत्यात भरले.
नीरा नदीत फेकलं पोतं
एक पोतं हे नीरा नदीत फेकलं तर दुसरं पोतं हे एका शेततळ्यात फेकून पसार झाले. पोलिसांनी तिन्ही आरोपींनी अटक केली आहे. नीरा नदी आणि शेततळ्यातून पोती बाहेर काढण्यात आली आाहे.
अनैतिक संबंधातून केली हत्या
सतीश उर्फ आप्पा दादासो दडस याची अनैतिक संबंधातून हत्या करण्यात आल्याचं पोलीस तपासात उघड झालंआहे. सतीशचं गावातील एक महिलेसोबत अनैतिक संबंध होते. तिचा नवरा हा सतीशसोबतच काम करत होता. तर त्याच महिलेच्या सतीश माने नावाच्या आरोपीशी आधी संबंध होते. या महिलेनं तिचा पहिला प्रियकर आणि पतीच्या मदतीने सतीशला संपवण्याचा कट रचला होता. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. फलटण पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.
