महाराष्ट्रात 11 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज ते रेड अलर्ट देण्यात आला आहे. पुढचे चार दिवस मुसळधार ते अति मुसळधार पाऊस राहील. पालघर, रायगड, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस राहणार आहे. मुंबईत मात्र यलो अलर्ट देण्यात आला आहे. विकेण्डला पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
इकडे धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, घाटमाथा, पुणे, कोल्हापूर, सातारा अमरावती, जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. लातूर, धाराशिव, सांगली, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला नाही. मात्र ढगाळ वातावरणामुळे घामाच्या धारा वाहतील.
advertisement
विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये पुढचे दोन दिवस यलो अलर्ट देण्यात आला आहे. 40 किमी वेगाने वारे वाहतील, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानंतर या भागांमध्ये पावसाचा जोर कमी होण्याची शक्य़ता आहे. सप्टेंबर महिन्यातही सर्वसामान्यपेक्षा अधिक पाऊस राहण्याची शक्यता आहे.
Farmer Success Story: शेतकऱ्याची भारी आयडिया, उसात केली 5 पिकांची लागवड, आता लाखांत कमाई
साताऱ्यातील कोयना धरणात पाऊस सुरू असल्याने कोयना धरण 99 टक्के भरले आहे. त्यामुळे कोयना धरणाचे सर्व दरवाजे तिसऱ्यांदा उघडण्यात आले असून कोयना नदीपात्रात 15 हजार 700 क्यूसेस पाणी सोडण्यात आले आहे. कोयना धरण परिसरात पश्चिम घाटात पावसाचा जोर पुन्हा वाढू लागला आहे. त्यामुळे धरणाचे दरवाजे 1 फूट 6 इंचानी उघडले आहेत.
जळगावच्या जामनेरमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावलीय. दमदार पावसामुळे जामनेर तोंडापूर मध्यम प्रकल्प 100 टक्के भरलं. दरम्यान परिसरातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. अकोला जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावलीय. यामुळे जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ झाली.494 क्यूसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात आलाय. दरम्यान नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.