तापमानात विचित्र बदल
विदर्भ आणि मराठवाड्याचा काही भाग वगळता पावसाचा अंदाज नाही. काही ठिकाणी अगदी तुरळक पाऊस होण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. एकीकडे वाढणारी प्रचंड उष्णता दुसरीकडे पावसाचं वातावरण यामुळे लोक हैराण झाले आहेत. पाऊस पडून गेल्यावरही खूप गरम होत आहे. अंगाची लाहीलाही होत आहे.
advertisement
राज्यात सध्या एकीकडे उन्हाचा चटका वाढत असतानाच दुसरीकडे पावसाळी वातावरण तयार झालं आहे. स्कायमेटने दिलेल्या अंदाजानुसार, अरबी समुद्रावरून येणारे वारे आणि पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर निर्माण झालेल्या चक्रीय वाऱ्यांच्या स्थितीमुळे महाराष्ट्रातील वातावरणात मोठी उलथापालथ होत आहे. याचा सर्वाधिक फटका मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाला बसण्याची शक्यता आहे.
विदर्भ-मराठवाड्यात यलो अलर्ट
पुढील दोन ते तीन दिवस विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. काही जिल्ह्यांत सोसाट्याचा वारा वाहून गारपीट होण्याची शक्यता असल्याने हवामान विभागाने 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे. विशेषतः नागपूर, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या भागात पावसाचा जोर अधिक राहू शकतो. विदर्भात मात्र आजपासूनच उष्णतेची लाट जाणवू शकते.
कोकण आणि मुंबईची स्थिती काय?
मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर पावसाची शक्यता कमी असली, तरी या भागात ढगाळ वातावरण आणि आर्द्रता वाढल्याने उकाडा असह्य होणार आहे. ८ एप्रिलच्या सुमारास पालघर, ठाणे आणि मुंबईच्या काही भागात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तर उत्तर महाराष्ट्र आणि पुण्यात हलक्या स्वरुपाचा पाऊस होऊ शकतो. तर तापमाना 2-4 अंशांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे.
Mumbai Fish Prise: आता मच्छीही महागाली! पापलेट, सुरमई अन् हलव्याच्या किंमती पाहून धक्काच बसेल
का पडतोय अवकाळी पाऊस
शेतकऱ्यांची चिंता वाढली!
सध्या अनेक ठिकाणी पिकांची काढणी अंतिम टप्प्यात आहे. अशातच ८ तारखेपर्यंत राज्याच्या विविध भागांत पावसाच्या सरी कोसळणार असल्याचा अंदाज आहे. ७ आणि ८ एप्रिलला मध्य प्रदेशला लागून असलेल्या महाराष्ट्राच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये सोसाट्याचा वारा आणि पावसाचा जोर वाढू शकतो. यामुळे रब्बी पिकांसह फळबागांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
