TRENDING:

Amravati: चहा पिऊन घरी जाणाऱ्या मित्रांवर काळाजी झडप, चौघांचा जागीच अंत, 3 गंभीर जखमी

Last Updated:

Amravati Accident News: अमरावती-अकोला महामार्गावर बेलोरा विमानतळ परिसरात भरधाव ट्रकने एका कारला जोरदार धडक दिली. या धडकेत बडनेरा येथील चार तरुण जागीच ठार झाले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अमरावती-अकोला महामार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास एक हृदयद्रावक घटना घडली आहे. येथील बेलोरा विमानतळ परिसरात भरधाव ट्रकने एका कारला जोरदार धडक दिली. या धडकेत बडनेरा येथील चार तरुण जागीच ठार झाले, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या भीषण अपघातात एकाच वेळी चार मित्रांचा मृत्यू झाल्याने बडनेरा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अपघातात चार मित्रांचा दुर्दैवी अंत
अपघातात चार मित्रांचा दुर्दैवी अंत
advertisement

चहा पिऊन परतताना झाला भीषण अपघात

मिळालेल्या माहितीनुसार, बडनेरा येथील सात युवक रात्रीच्या वेळी फिरण्यासाठी बाहेर पडले होते. रात्री अंदाजे ११ वाजेच्या सुमारास हे सर्व जण बेलोरा विमानतळाजवळील एका हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी थांबले होते. चहा प्यायल्यानंतर ते आपल्या कारने परत येत असताना, महामार्गावर समोरून येणाऱ्या एका भरधाव ट्रकने त्यांच्या कारला भीषण धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला.

advertisement

चार तरुणांचा जागीच मृत्यू; तिघे गंभीर

अपघाताच्या वेळी कारमध्ये एकूण सात जण प्रवास करत होते. या भीषण धडकेत कारमधील चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला. मोहम्मद अनस मोहम्मद सईद (वय २० वर्षे), मोहम्मद तल्हा मोहम्मद अनीस (वय २२ वर्षे), मोहम्मद अवेज मोहम्मद सईद (वय २६ वर्षे) आणि अब्दुल अन्वेस अब्दुल सलीम (वय २२ वर्षे) असं मृत पावलेल्या तरुणांची नावं आहेत. अपघातातील इतर तीन युवक गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने उपचारासाठी अमरावती येथील रीम्स (REIMS) हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी एकाची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.

advertisement

ट्रक चालक फरार; पोलिसांकडून तपास सुरू

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांद्याचे भाव पुन्हा कोसळले, लिंबू आणि केळीची काय स्थिती? एका क्लिकवर चेक करा
सर्व पहा

अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळी न थांबता आपलं वाहन घेऊन फरार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, महामार्गावरील आणि हॉटेल परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे फरार ट्रक चालकाचा शोध घेतला जात आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Amravati: चहा पिऊन घरी जाणाऱ्या मित्रांवर काळाजी झडप, चौघांचा जागीच अंत, 3 गंभीर जखमी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल