TRENDING:

अशोक खरात प्रकरणाचा CDR रिपोर्ट दमानियांना कसा मिळाला? SIT च्या प्रमुख सातपुतेंनी थोडक्यात सांगितलं, पण...

Last Updated:

अशोक खरात प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीच्या प्रमुख  आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते आणि महत्त्वाच्या अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नाशिक: लैंगिक अत्याचार आणि फसवणूक प्रकरणी अशोक खरातचे रोज नव नवीन कारनामे उजेडात येत आहे. अशातच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अशोक खरात याला कुणी कुणी आणि किती फोन केले याची सीडीआरची माहितीच लिक केली होती. दमानियांनी ही माहित लिक केल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी खरात प्रकरणाची चौकशी करणाऱ्या एसआयटीच्या टीमने पत्रकार परिषद घेतली पण सीडीआर कसे लिक झाले, याबद्दल कोणतीच माहिती दिली नाही.
News18
News18
advertisement

अशोक खरात प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीच्या प्रमुख  आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते आणि महत्त्वाच्या अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये सातपुते यांनी खरात प्रकरणात आतापर्यंत काय काय घडलं किती गुन्हे दाखल झाले, याची माहिती दिली. सगळ्याच महत्त्वाचं म्हणजे, खरातशी कोण कोण बोललं याचा सीडीआर लिक कसा झाला, याबद्दल सातपुते यांनी मात्र मोघम उत्तर दिलं.

advertisement

"अशोक खरात प्रकरणामध्ये सीडीआरबद्दल जो प्रश्न आहे, त्याबद्दल शासन स्तरावर चौकशी होत आहे, चौकशीत जे काही निष्पन्न होईल, ते सगळ्यांच्या समोर येईल' असं उत्तर तेजस्वी सातपुते यांनी देऊन पुढे बोलण्याचं टाळलं. त्यामुळे सीडीआर कसा लिक झाला, याचे उत्तर अजूनही अनुत्तरीत राहिलं आहे.

दरम्यान,  १७ मार्च २०२६ रोजी पहिला गुन्हा दाखल झाला होता, ३ दिवसांनी एसआयटीकडे तपास आला होता. उर्वरीत ४ गुन्हे हे आठवड्याभरात दाखल झाले होते. ४० ते ४५ दिवसांमध्ये ८ गुन्ह्यांचा तपास करायचा आहे. त्यासाठी एसआयटी पूर्ण तपास करत आहे.  अशोक खरातला पहिल्या गुन्ह्यात १४ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती.  पहिल्या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली होती. आता पुढील गुन्ह्यात पोलीस कोठडी मिळवण्यासाठी न्यायालयामध्ये विनंती करणार आहोत. व्हीसी द्वारे कोर्टात हजर करणार आहोत, असं सातपुतेंनी सांगितलं,

advertisement

"नाशिक आणि नगर जिल्ह्यात खरात विरोधात 12 गुन्हे दाखल झाले आहे एकूण 11 गुन्हे आमच्याकडे तपासला आहे यातील 8 गुन्हे लैंगिक शोषणाचे आणि 3 गुन्हे आर्थिक फसवणूक दाखल झाले आहे.  आजपर्यंत 30 साक्षीदार आम्ही तपासले.  चिंचोके, खडे, विकून पैसे घेत होता.   ईशान्यश्वर मंदिरात हातचालाखी करून भीती निर्माण करायचा. त्यामुळे पोलिसांनी आवाहन केल्यानंतर या पीडित महिला धाडसाने पुढे आल्या आहे.  त्यांचे व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये बाळगू नये , त्यांच्या मानसिक आरोग्य आणि धैर्यासाठी ते आवश्यक. केवळ तर्क वितरकांच्या आधारावर वृत्त माध्यमांनी टाळावे, अशी विनंती सातपुते यांनी केली.

advertisement

4650 लिंक डिलीट

आतापर्यंत या प्रकरणी सोशल मीडियावर 4650 लिंक सायबर टीम ने डिलीट करून घेतल्या.  451 अकाउंटला कायमस्वरूपी बंद केले आहेत.  यात दोन गुन्हे दाखल सातपूर आणि अहिल्यानगरमध्ये दाखल आहे.

खरातची प्रकरणात ईडीची एंट्री

या प्रकरणामध्ये ईडीने दखल घेतली आहे. ईडीने विशेष तपास पथकाकडून जी माहिती मागवली ती दिली आहे. भविष्यात ईडीला पूर्ण सहकार्य असणार आहे.  भविष्यात अंधश्रद्धेपोटी कोणत्याही महिलेचं शोषण होऊ नये म्हणून पोलीस आवाहन करतंय.

advertisement

खरातने गुन्ह्याची कबुली दिली का? 

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कुठे तरी सुरुवात करावी लागते! रस्त्यावर उभं राहून प्रोडक्ट विकले, आता वर्षाला 20 कोटींचा बिझनेस! Video
सर्व पहा

मला जी माहिती मिळाली ती सांगितली आहे. त्यामुळे सगळ्यांनी सहकार्य करावे, काही गोपयनिय माहिती उघड करू नये. त्याचा तपासावर परिणाम होईल. चार्जशिट दाखल होईल, तेव्हा सगळं काही समोर येईल, असं सातपुते यांनी सांगितलं.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अशोक खरात प्रकरणाचा CDR रिपोर्ट दमानियांना कसा मिळाला? SIT च्या प्रमुख सातपुतेंनी थोडक्यात सांगितलं, पण...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल