TRENDING:

तुमचं बंद झालेलं रेशनकार्ड पुन्हा सुरू करायचं आहे का? मग घरबसल्या मोबईलवरून करा झटपट प्रोसेस

Last Updated:

Ration Card : मध्य-पूर्वेतील इराण-अमेरिका युद्धामुळे जागतिक स्तरावर इंधनपुरवठ्यावर परिणाम होत असून त्याचे पडसाद भारतातही उमटू लागले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मध्य-पूर्वेतील इराण-अमेरिका युद्धामुळे जागतिक स्तरावर इंधनपुरवठ्यावर परिणाम होत असून त्याचे पडसाद भारतातही उमटू लागले आहेत. काही राज्यांमध्ये गॅस सिलिंडर आणि पेट्रोलच्या तुटवड्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत पर्यायी इंधन म्हणून रॉकेल (केरोसिन) पुन्हा रेशन दुकानांतून उपलब्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, अनेक नागरिकांचे रेशन कार्ड ‘सस्पेंड’ किंवा निष्क्रिय असल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
Ration Card
Ration Card
advertisement

‘UMANG’ ॲप ठरणार मदतीला

रेशन कार्ड बंद होण्यामागे मुख्यतः केवायसी (KYC) पूर्ण न करणे किंवा दीर्घकाळ धान्य न घेणे ही कारणे असतात. अशा नागरिकांसाठी केंद्र सरकारचे UMANG (Unified Mobile Application for New-age Governance) हे ॲप उपयुक्त ठरत आहे. या ॲपच्या माध्यमातून रेशन कार्डशी संबंधित अनेक सेवा घरबसल्या मिळू शकतात.

UMANG ॲपवर ‘Mera Ration’ आणि ‘PDS’ (Public Distribution System) या सेवांचा समावेश असून, रेशन कार्डची माहिती तपासणे, अपडेट करणे आणि ई-केवायसी पूर्ण करणे शक्य आहे.

advertisement

बंद रेशन कार्ड पुन्हा सुरू करण्याची प्रक्रिया काय?

रेशन कार्ड निष्क्रिय झाल्यास ते पुन्हा सुरू करण्यासाठी नागरिकांना काही सोप्या टप्प्यांचे पालन करावे लागते. सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअरवरून UMANG ॲप डाउनलोड करून मोबाईल नंबरच्या आधारे नोंदणी करावी लागते आणि MPIN सेट करावा लागतो. त्यानंतर ॲपमधील सर्च बारमध्ये ‘Mera Ration’ किंवा ‘PDS’ सेवा शोधावी.

advertisement

यानंतर संबंधित राज्य (उदा. महाराष्ट्र) निवडून ‘View Ration Card Details’ या पर्यायावर क्लिक करून रेशन कार्ड क्रमांक टाकावा. यामुळे कार्ड सक्रिय आहे की नाही, याची माहिती मिळते. जर कार्ड निष्क्रिय असेल, तर ‘E-KYC’ किंवा ‘Update Member Details’ या पर्यायावर जाऊन माहिती अद्ययावत करावी लागते.

E-KYC पूर्ण करणे आवश्यक

रेशन कार्ड पुन्हा सक्रिय करण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अत्यावश्यक आहे. यासाठी आधार कार्ड लिंक करणे गरजेचे आहे. संबंधित सदस्याचे नाव निवडून त्याचा आधार क्रमांक टाकल्यानंतर नोंदणीकृत मोबाईलवर OTP येतो. हा OTP टाकून प्रक्रिया पूर्ण केली की ई-केवायसी यशस्वी झाल्याचा संदेश मिळतो.

advertisement

पारदर्शक वितरणासाठी महत्त्वाचे पाऊल

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, कांदा दर पडलेलेच, लिंबाला काय मिळतोय भाव?
सर्व पहा

सरकारच्या मते, ई-केवायसीमुळे रेशन वितरण प्रक्रियेत पारदर्शकता वाढते आणि अपात्र लाभार्थ्यांना रोखणे शक्य होते. त्यामुळे सर्व पात्र लाभार्थ्यांना योग्य वेळी अन्नधान्य आणि इंधनाचा पुरवठा सुनिश्चित होतो.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
तुमचं बंद झालेलं रेशनकार्ड पुन्हा सुरू करायचं आहे का? मग घरबसल्या मोबईलवरून करा झटपट प्रोसेस
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल