बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल उद्या (५ मे) जाहीर करणार असून दहावीचा निकाल देखील १६ मे पूर्वीच लागण्याची शक्यता वर्तवण्यात आहे. कारण यंदा दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आली होतीय छत्रपती संभाजीनगर, लातूर, पुणे, नाशिक, नागपूर, कोकण, अमरावती, कोल्हापूर, मुंबई विभागातील बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम पूर्ण झाले.
advertisement
निकालाचे काम सुरू
यंदा परीक्षा लवकर झाल्याने निकालही लवकर लागेल असे, शिक्षण मंडळाकडून जाहीर करण्यात आले आहे. सध्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम संपले असून, निकालाचे काम सुरू आहे अशी माहिती बोर्डाकडून देण्यात आली आहे. जून महिन्यात पुढील अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू होत असल्याने यंदा मे महिन्यातच निकाल लावणार असल्याचे बोर्डाकडून सांगण्यात आले.
बारावीचा निकाल कधी कुठे कसा पाहणार?
सोमवारी ५ मेला बारावीचा निकाल लागणार आहे. दुपारी एक वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने निकाल पाहता येणार आहे. खालील संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे.
- mahahsscboard.in
- mahresult.nic.in
- hscresult.mkcl.org
निकाल कसा चेक कराल?
-सगळ्यात आधी बोर्डाच्या अधिकृत बेवसाइटवर जा.
-होमपेजवर ‘महाराष्ट्र एसएससी/एचएससी निकाल 2025’ लिंक दिसेल. त्याला क्लिक करा.
-क्लिक करताच नवीन विंडो ओपन होईल. त्याठिकाणी सीट नंबर आणि इतर माहिती भरुन ‘सबमिट’ बटनवर क्लिक करा.
-त्यानंतर तुमचा बोर्डाचा निकाल स्क्रीनवर दिसेल.