समोर आलेल्या माहितीनुसार, श्रीकृष्ण टेकाळे यांचा विवाह सुमारे दीड ते दोन वर्षांपूर्वी झाला होता. पत्नी साक्षी श्रीकृष्ण टेकाळे (वय 28 ) हिच्यासोबत कोल्हेगावात राहत होते. रविवारी सकाळी दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाला. वाद चिघळल्याने श्रीकृष्ण यांनी पत्नीला मारहाण केली. त्यात ती गंभीर जखमी होऊन मृत पावली. त्यानंतर मानसिक तणावाखाली येत श्रीकृष्ण याने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची प्राथमिक माहिती
advertisement
पोलिसांची प्राथमिक माहिती
घटनेची माहिती मिळताच धाराशिव ग्रामीण पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले आहेत. प्राथमिक चौकशीत घटनास्थळावरून एक चिठ्ठी पोलिसांना मिळाल्याचे समजते. मात्र त्या चिठ्ठीतील मजकूर उघड करण्यात आलेला नाही. या घटनेमागे आर्थिक विवंचना की घरगुती वाद, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस तपास सुरू आहे.
गावात शोककळा
तरुण दाम्पत्याचा असा दुर्दैवी अंत झाल्याने कोल्हेगाव परिसरात शोककळा पसरली आहे. गावकरी मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले होते. टेकाळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून लवकरच या घटनेमागील खरी कारणमीमांसा स्पष्ट होणार असल्याचे सांगितले जात आहे.
वाशिममध्ये पत्नीवर कुऱ्हाडीने वार करत केली हत्या
वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील कोठारी गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. पतीनं पत्नीची धारधार शस्त्राने हत्या केली अन् त्यानंतर .तर स्वत: गळफास घेतल्याचे समोर आले आहे. हिंमत हा मागील काही महिन्यांपासून व्यसनाच्या आधीन गेल्यामुळे त्याचे पत्नी कल्पनासोबत नेहमी वाद होत होते. दोघे ही पती पत्नी मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. त्यांना मोठी 11 वर्षांची मुलगी,दुसरी मुलगी वय 9 वर्षे आणि लहान मुलगा 7 वर्षाचा आहे. कुटुंबाचा खर्च ही वाढला होता त्यामुळे हिंमत हा नेहमी चीड चीड करत होता, त्यासाठी पत्नीने दवाखान्यात जाण्याचा तगादा लावला. मात्र पत्नीने त्याला जाण्यासाठी तगादा लावल्याने त्याचा राग अनावर झाला. रागाच्या भरात पतीने कुऱ्हाडीने पत्नीच्या गळ्यावर आणि डोक्यात वार केले. त्यामुळं पत्नी कल्पना धोंगडे लगेच रक्ताच्या थारोळ्यात पडली. प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने पत्नीचा जीव गेला. पत्नीची हत्या केल्यानंतर हिंमतने ही घरातच गळफास घेत आत्महत्या केली.