सध्याचे मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी हे आजच म्हणजेच ३१ मार्च २०२६ रोजी सेवानिवृत्त होत असल्याने, मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) आयुक्तपदी कोण, याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. सनदी अधिकारी मिलिंद म्हैसकर, महसूल विभागाचे अतिरिक्त सचिव विकास खारगे, एमएमआरडीएचे आयुक्त संजीव मुखर्जी, सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव व्ही राधा यांची नावे आघाडीवर होती. परंतु या सगळ्यांना मागे सारून अश्विनी भिडे यांची मुंबई महापालिका आयुक्तपदी लागली आहे.
advertisement
अश्विनी भिडे या १९९५ बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRCL) च्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून मेट्रो ३ च्या कामात त्यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तसेच मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय काम केले. आता मुंबई महापालिकेची धुरा त्यांच्या हाती आली आहे. अश्विनी भिडे या मुंबई महापालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त असणार आहेत.
कोण आहेत अश्विनी भिडे?
अश्विनी भिडे १९९५ बॅचच्या सनदी अधिकारी
मुंबईत मेट्रोचे जाळे उभे राहण्यात अश्विनी भिडे यांचे महत्त्वाचे योगदान
त्याचमुळे अश्विनी भिडे यांचा मेट्रो वुमेन असेही संबोधले जाते
मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणूनही त्यांचे उल्लेखनीय काम राहिले
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मर्जीतल्या अधिकारी म्हणून त्यांची विशेष ओळख
गेल्या काही वर्षांत मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी कोण कोण?
इक्बाल चहल यांची बदली झाल्यानंतर मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदासाठी भूषण गगराणी यांची नियुक्ती झाली. त्यांच्यानंतर आता अश्विनी भिडे यांच्याकडे मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
