TRENDING:

पंढरपुरी लाखेचा चुडा, परंपरेचे सौंदर्य आणि अर्थनिर्मितीचा प्रवास

Last Updated:

महाराष्ट्रातील प्रत्येक तीर्थक्षेत्राचा काही ना काही खास वारसा आहे, पण सोलापूर जिल्ह्यातील पंढरपुरची ओळख लाखेच्या चुड्याशिवाय अपूर्ण आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
इरफान पटेल - प्रतिनिधी
advertisement

सोलापूर : महाराष्ट्रातील प्रत्येक तीर्थक्षेत्राचा काही ना काही खास वारसा आहे, पण सोलापूर जिल्ह्यातील पंढरपुरची ओळख लाखेच्या चुड्याशिवाय अपूर्ण आहे. सौभाग्यवतींच्या सौंदर्यात भर घालणारे हे चुडे, केवळ दागिने नाहीत तर तीर्थस्थळी रुजलेल्या श्रद्धेचा सुंदर भाग आहेत.

परंपरेची मुळे

पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतल्यानंतर सुवासिनींनी लाखेचा चुडा घालणे शुभ मानले जाते. कारागीर रामेश्वर सातपुते सांगतात की, हा चुडा साधा असला तरी त्याला तीर्थक्षेत्राचे महात्म्य लाभल्यामुळे त्याचे महत्त्व वाढले आहे. विशेषतः संक्रांतीच्या काळात हळदीकुंकवाच्या वाणात देवीला लाखी चुडा चढवण्याची परंपरा आहे. त्यामुळे हा चुडा केवळ दागिना नसून श्रद्धेचा एक भाग बनला आहे.

advertisement

लाखेच्या चुड्यांचे गृहोद्योग

पंढरपुर परिसरातील लाखेच्या चुड्याने अनेक कुटुंबांना रोजगार मिळवून दिला आहे. बांगड्यांचे विविध प्रकार आणि बदलत्या काळातील आकर्षक डिझाईन्स बाजारात आणून लाखेच्या चुड्याला नवचैतन्य मिळाले आहे. पारंपरिक चुड्यांबरोबरच लाखी ब्रेसलेट आणि कडे यांचीही मागणी वाढत आहे. यात्रा-जत्रांमध्ये लाखेच्या बांगड्या विकण्यासाठी जाणाऱ्या महिलांची संख्या लक्षणीय आहे.

भाविकांचा पसंतीस उतरलेला चुडा

advertisement

पंढरपुरात येणाऱ्या लाखो महिला भाविक हा चुडा श्रद्धेने आणि उत्साहाने घेतात. स्थानिक बाजारपेठेत आणि तीर्थक्षेत्रांवर हा चुडा अतिशय लोकप्रिय आहे. "हा फक्त व्यवसाय नाही तर आमच्यासाठी श्रद्धेचा व्यवसाय आहे," असे कारागीर म्हणतात.

सौंदर्य आणि अर्थाचे संतुलन

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: कृषी मार्केटनं वाढवलं टेन्शन; द्राक्षे, केळीची आवक घटली, कांदा अन् लिंबूला किती मिळाला भाव?
सर्व पहा

लाखेचा चुडा सौंदर्याचा दागिना असतानाच, तो हजारो कुटुंबांसाठी जीवनाचा आधारही आहे. त्यामुळे लाखेच्या चुड्याचा वारसा केवळ परंपरांमध्ये मर्यादित न राहता त्याने अर्थनिर्मिती आणि रोजगारनिर्मितीला चालना दिली आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पंढरपुरी लाखेचा चुडा, परंपरेचे सौंदर्य आणि अर्थनिर्मितीचा प्रवास
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल