Jalgaon Accident News : जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत जामनेर तालुक्यात गारखेडा येथे पॅगो रिक्षा व सिमेंट मिक्सरची भीषण धडक झाल्याची घटना घडली होती. या भीषण अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला असून 7 जण गंभीर जखमी आहेत. या जखमींना उपचाराखातर नजीकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर या अपघातात निकिता गोपाळ निंबाळकर (वय 21) आणि प्रमोद श्रीराम गुरु भैया (वय 32) यांचा मृ्त्यू झाला आहे.यातल्या निकिताचा साखरपूडा पार पडला होता आणि काही दिवसात तिच लग्न देखील होणार होतं, पण त्याधी तिच्यावर मृत्यू ओढवला आहे. त्यामुळे या घटनेने निंबाळकर कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील गारखेडा परिसरात ही अपघाताची घटना घडली आहे. या घटनेत सिमेंट मिस्कर आणि पॅगो रिक्षाची समोरासमोर धडक झाली होती.हा अपघातात इतका भीषण होता की सर्वत्र आक्रोश पसरला होता नागरीकांची धावाधाव सुरू होती. या अपघातात निकिता गोपाळ निंबाळकर (रा. चिंचखेडा) आणि प्रमोद श्रीराम गुरूभैया (वय ३२, रा. तळेगाव) यांचा मृत्यू झाला आहे. निकिता निंबाळकर यांचा काही दिवसांपूर्वीच साखरपुडा झाला होता. तसेच काही दिवसांनी तिचं लग्न देखील होणार होतं.त्यामुळे निंबाळकर कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
तसेच या अपघातात जयेश गोपाळ निंबाळकर (१६), सरला गोपाळ निंबाळकर (३९), योगेश विठ्ठल गायकवाड (४५, चिंच), सुरेखा विलास कापडे (५०, नांभाजी नगर), अखिलेश कुमार (५०, उत्तर प्रदेश) आणि संगीता सुभाष चौधरी (५०, संभाजीनगर) हे जखमी झाले आहेत.
खरं तर निंबाळकर कुटुंब भुसावळ येथे लग्न समारंभ आटोपून जामनेर तालुक्यातील चिंचखेडा येथे घरी परतत होते. एकाच पॅगो रिक्षात 8 ते 10 प्रवासी असल्याची माहिती असून गारखेडा जवळ सिमेंट मिक्सर ट्रक आणि रिक्षाची समोरासमोर जोरदार धडक झाली. अपघातानंतर जखमींना तातडीने प्राथमिक उपचार देऊन जळगाव जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती डॉक्टर चांदा यांनी दिली. घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून पुढील तपास संबंधित यंत्रणेकडून सुरू आहे.
