TRENDING:

Jalgaon News: जळगाव हादरलं! प्रेयसीची हत्या करून प्रियकराचा शेवट, मोबाईलमधील 'अनसेंड' मेसेजने उडवला थरकाप

Last Updated:

Jalgaon Crime News: विवाहित प्रेयसी वेळ देत नसल्याच्या कारणाने विवाहित प्रियकराने तिच्या घरात जात तिला संपवत स्वत: टोकाचं पाऊल उचल

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
जळगाव: विवाहबाह्य प्रेम संबंधातून झालेल्या हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. विवाहित प्रेयसी वेळ देत नसल्याच्या कारणाने विवाहित प्रियकराने तिच्या घरात जात तिला संपवत स्वत: टोकाचं पाऊल उचललं. प्रियकराने स्वत:ला संपवण्याआधी शेवटचा मेसेज टाइप केला. मात्र, तो सेंड झाला नसल्याचे समोर आले आहे.
जळगाव हादरलं! विवाहित प्रेयसीची हत्या करून प्रियकराचा शेवट, मोबाईलमधील 'अनसेंड' मेसेजने उडवला थरकाप
जळगाव हादरलं! विवाहित प्रेयसीची हत्या करून प्रियकराचा शेवट, मोबाईलमधील 'अनसेंड' मेसेजने उडवला थरकाप
advertisement

अनिता जगदीश पाटील आणि देवा सुरेश धनगर यांचे विवाहबाह्य प्रेमसंबंध होते. "जगदीश, मला माफ करा. माझे आणि अनिताचे प्रेम आहे, मी तिच्याशिवाय राहू शकत नाही..." अकुलखेडा येथील दुहेरी हत्याकांडातील आरोपी देवानंद धनगर याने अनिताच्या पतीला पाठवण्यासाठी हा मेसेज टाईप करून ठेवला होता. पण नियतीला काहीतरी वेगळेच मान्य होते. तो मेसेज सेंड व्हायच्या आतच रक्ताचा सडा पडला आणि दोन आयुष्यांचा करुण अंत झाला.

advertisement

काय होतं त्या मेसेजमध्ये?

उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी दिलेल्या माहितीनुसार, देवानंदच्या मोबाईलमध्ये एक अनसेंड (Unsent) मेसेज सापडला आहे. त्यात त्याने लिहिले होते की, "मला ती (अनिता) टाळत आहे, दुसऱ्यासोबत बोलते. मी तिला सोडणार नाही आणि मी पण जिवंत राहणार नाही". आपल्या प्रेयसीचा संशय आणि विरहाच्या वेदनेतून त्याने हा शेवटचा निरोप टाईप केला होता, मात्र तो क्लिक करण्यापूर्वीच त्याने टोकाचे पाऊल उचलले.

advertisement

विवाहित प्रियकराचा माथेफिरूपणा

अनिता जगदीश पाटील आणि देवानंद सुभाष धनगर (२६) यांचे गेल्या ४-५ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. सोशल मीडियावरून झालेली ही ओळख प्रेमात बदलली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून अनिताने प्रतिसाद देणे बंद केल्यामुळे देवानंद संतापला होता. शनिवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास त्याने मोटारसायकलने अकुलखेडा गाठले. तिथे दोघांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर भीषण हत्याकांडात झाले.

advertisement

अंगावर शहारे आणणारा घटनाक्रम

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
होळीला बाहेरचे रंग कशाला, घरीच बनवा केमिकल मुक्त कलर, making चा संपूर्ण Video
सर्व पहा

देवानंदने आपल्यासोबत आणलेल्या गावठी कट्ट्यातून आधी अनिताच्या डोक्यात गोळी झाडून तिची हत्या केली. त्यानंतर काही क्षणातच स्वतःवरही गोळी झाडून आपले आयुष्य संपवले. हॉटेल संकेतच्या मागे असलेल्या प्लॉट भागात घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. जर तो मेसेज वेळेत सेंड झाला असता किंवा कोणाला सुगावा लागला असता, तर कदाचित हे हत्याकांड टळले असते, अशी चर्चा आता गावात सुरू आहे. ही घटना घडली तेव्हा अनिताचे पती जगदीश पाटील हे कामाच्या निमित्ताने बाहेर गेले होते.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Jalgaon News: जळगाव हादरलं! प्रेयसीची हत्या करून प्रियकराचा शेवट, मोबाईलमधील 'अनसेंड' मेसेजने उडवला थरकाप
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल