प्राथमिक माहितीनुसार, खडसे हे सध्या मुक्ताईनगर येथे वास्तव्यास असल्याने जळगावातील त्यांचे घर काही दिवसांपासून बंद होते. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि चोरी केली. नेमकी किती मालमत्ता लंपास झाली याबाबत पोलिसांकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
घटनेची माहिती मिळताच जळगाव शहर पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी तात्काळ याचा तपास सुरू केला आहे. या प्रकरणी चौकशीही करण्यात येत असून चोरीच्या घटनेबाबतची अधिक माहिती घेतली जात आहे.
advertisement
काही दिवसांपूर्वीच मंत्री रक्षाताई खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील पेट्रोल पंपावर दरोड्याची घटना घडली होती. त्या घटनेनंतर अल्पावधीतच जळगावातील खडसे यांच्या घरात चोरी झाल्याने परिसरातील सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांकडून सीसीटीव्ही फूटेज तपासले जात असून, चोरट्यांचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेमुळे शहरात चर्चांना उधाण आले आहे.
घरातून चोरांनी कशावर मारला डल्ला?
एकनाथ खडसे यांच्या घरातून काय चोरीला गेले, याची अधिकृत माहिती समोर आली नाही. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरांनी घरातून अंदाजे सहा ते सात तोळे सोन्याचे दागिने आणि सुमारे 35 हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील पेट्रोल पंपावर दरोड्याची घटना घडली होती.
