जळगावच्या धरणगाव तालुक्यातील दोन शाळांमधील २४२ विद्यार्थ्यांपैकी ७१ विद्यार्थ्यांत प्री-डायबेटीक अर्थात मधुमेहपूर्व लक्षणे आढळून आल्याची धक्कादायक माहिती समोर आली. जळगाव जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने केलेल्या तपासणीत ही माहिती समोर आली असल्याचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी सांगितलं.
आरोग्याच्या दृष्टिकोनातून आकडा मोठा
धरणगाव तालुक्यातील पिंप्री येथील प्राथमिक शाळा आणि कन्या शाळा यामधील इयत्ता १ ते ४ थीच्या वर्गातील २४२ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या तपासणीत ७१ विद्यार्थ्यांमध्ये धरणगावातील आरोग्य तपासणीत बाब उघड मधुमेहपूर्व लक्षणे असल्याचे आढळून आले. आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा आकडा मोठा असल्याने यावर ठोस उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले.
advertisement
जंक फूडपासून विद्यार्थ्यांना दूर ठेवा
जंक फूडपासून विद्यार्थ्यांना दूर करण्यासाठी आहार बदलाची जनजागृती पालकांमध्ये करण्यात येणार असल्याचे सीईओ मीनल करणवाल यांनी स्पष्ट केलं. आहारात बदल केल्यास प्री-डायबेटीक विद्यार्थी या संकटातून निश्चितपणे बाहेर पडतील, असा विश्वास सीईओ करणवाल यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला
तसेच जून महिन्यात शाळा सुरू झाल्यानंतर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील इतर विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी व्हिल्स ग्लोबल फाउंडेशन या संस्थेसोबत करार करून करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.