सुरेश जैन यांचा भाजपला पाठिंबा
सुरेश जैन यांनी 2 दिवसांपूर्वीच शिवसेना उबाठा गटाचा राजीनामा दिला होता. सक्रीय राजकारणात पुन्हा यायची इच्छा नाही. शहर, राज्य आणि देश या विकासासाठी मी कायम सोबत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासात्मक भूमिकेवर माझा विश्वास असल्याचे जैन यांनी सांगितले. जळगाव लोकसभा मतदारसंघातील अल्पसंख्यांक मतांवर सुरेशदादा यांचा प्रभाव आहे. गिरीश महाजन यांच्या सोबत झालेल्या भेटीनंतर असं सांगत सुरेश जैन यांनी आपली भुमिका स्पष्ट केली.
advertisement
ठाकरेंची साथ का सोडली?
सुरेश जैन यांचे जळगावात मोठं प्रभाव क्षेत्र आहे. या भागातून जवळपास 34 वर्षे ते आमदार होते. बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना पहिल्यादा मंत्री केले होते. मात्र, घरकुल घोटाळा समोर आल्यानंतर त्यांच्या राजकीय प्रवासाला ब्रेक लागला. त्यांना तुरुंगवारी घडली. असे असूनही जळगावच्या राजकारणावर त्यांची पकड सुटली नाही. शिवसेनेत फुट पडल्यानंतर ते ठाकरेंबरोबर कायम राहीले. पण आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी ठाकरेंची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
वाचा - शरद पवारांनी पंतप्रधानांची ऑफर भरसभेत नाकारली, सोबत ठाकरेंचीही दिली गॅरंटी, म्हणाले...
सुरेश जैन यांच्या कारकीर्दीला कुठे लागला ब्रेक?
सुरेश जैन हे 1974 पासून जळगावच्या राजकारणात सक्रीय झाले. 1980 मध्ये पहिल्यांदा विधानसभेवर गेले. त्यानंतर सलग 34 वर्षे त्यांचा जळगावच्या राजकारणावर दबदबा राहीला आहे. ते 34 वर्षे आमदारही होते. युतीच्या काळात त्यांना मंत्री होण्याची संधी मिळाली होती. मात्र पुढे घरकुल घोटाळ्याचा त्यांच्यावर आरोप झाला. या आरोपात त्यांना दोषी ठरवण्यात आले. त्यांना जवळपास चार वर्षे जेलमध्येही रहावे लागले आहे. तिथूनच्या त्यांच्या राजकीय कारकीर्दीला घरघर लागली.