TRENDING:

जालना अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यात डेप्युटी कलेक्टरचा समावेश? भाजप आमदाराच्या आरोपाने खळबळ

Last Updated:

Heavy Rainfall Subsidy Scam: जिल्हाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यात सहभागी असणाऱ्यांविरोधात कडक कारवाईची अपेक्षा आमदार लोणीकर यांनी केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
जालना: जालना अतिवृष्टी अनुदान वाटप घोटाळ्यात तत्कालीन निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचाही समावेश असू शकतो, अशी शक्यता भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केली आहे. शिवाय या घोटाळ्यात सहभागी असणाऱ्या तहसीलदारांसह ७६ कर्मचाऱ्यांना निलंबित करून त्यांच्या मालमत्ता जप्त कराव्यात अशी मागणी देखील त्यांनी केलीय.
बबनराव लोणीकर
बबनराव लोणीकर
advertisement

विशेष म्हणजे आमदार लोणीकर यांची आज जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्या सोबत तब्बल तीन तास या विषयावर बैठक झाली. या बैठकीत अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यात सहभागी असणाऱ्यांविरोधात कडक कारवाईची अपेक्षा आमदार लोणीकर यांनी केली आहे.

घोटाळ्यात निवासी उप जिल्हाधिकाऱ्यांचा समावेश?

जालन्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यात तत्कालीन निवासी उप जिल्हाधिकाऱ्यांचा समावेश असू शकतो. त्यामुळे त्यांचीही यात चौकशी व्हायला हवी, अशी मागणी भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्या सोबतच्या बैठकीत केली आहे.

advertisement

अतिवृष्टी अनुदान घोटाळा हा तब्बल शंभर कोटींचा असून यात तलाठ्यांवर कारवाई झाली. मात्र दोन तालुक्यातील तहसीलदार आणि ग्रामसेवकांवर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे या घोटाळ्यात सहभागी असलेल्या ७६ कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी बबनराव लोणीकर यांनी केली आहे.

चौकशीत काय समोर आले?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
युद्धाचा फटका केळी उत्पादक शेतकऱ्यांना, फक्त दीड रुपये किलोने खरेदी, कांद्याला काय मिळतोय भाव?
सर्व पहा

जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या चौकशीमध्ये 2022 ते 2024 या कालावधीत बोगस शेतकरी दाखवून एकाच नावावर दुबार अनुदान उकळले गेले तसेच जमीन नसताना देखील अनुदान हडप केल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणाचे धागेदोरे तहसीलदारांपर्यंत पोहचले आहेत. याप्रकरणी शासन स्तरावरून फौजदारी गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.  या प्रकरणात यापूर्वी १० तलाठ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या चौकशी समितीमध्ये तत्कालिन आणि कार्यरत तहसीलदारांवर देखील ठपका ठेवण्यात आला आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
जालना अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यात डेप्युटी कलेक्टरचा समावेश? भाजप आमदाराच्या आरोपाने खळबळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल