जालना जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाला मोठं खिंडार पडलं आहे. घनसावंगीतील ठाकरे गटाचे नेते हिकमत उढाण हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. येत्या दहा तारखेला ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेते प्रवेश करणार आहेत. हा विधानसभेच्या तोंडावर ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
हिकमत उढाण यांनी शिवसेनेच्या तिकिटावर घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून दोनदा निवडणूक लढवली आहे. गेल्या निवडणुकीत ते राजेश टोपे यांच्याकडून अवघ्या 3 हजार 409 मतांनी पराभूत झाले होते.
advertisement
यंदाही त्यांनी टोपे यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. ते 10 तारखेला शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहेत. घनसांवगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील हिकमत उढाण यांच्या साखर कारखान्याचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार असून, तिथेच त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. त्यामुळं टोपे यांच्यासमोर पुन्हा एकदा मोठं आव्हान उभं राहण्याची शक्यता आहे.
