TRENDING:

नवरात्रीत मोसंबीला मागणी, दरही तेजीत, जालना मार्केटमध्ये नेमकी काय आहे परिस्थिती?, VIDEO

Last Updated:

jalna mosambi market situation - दिवाळीपर्यंत मोसंबीचे दर असेच किंवा काहीशी कमी होऊ शकतात. मात्र, दिवाळीनंतर दरात सुधारणा पाहायला मिळू शकते, असेही घनघाव यांनी सांगितले. मात्र, ज्या शेतकऱ्यांची मोसंबी हिरव्या रंगाची आहेत तेच भाव वाढीची प्रतीक्षा करू शकतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नारायण काळे, प्रतिनिधी
advertisement

जालना - नवरात्री उत्सव सुरू असल्याने मोसंबीला मोठी मागणी आहे. मात्र बाजार समितीमध्ये मोसंबीची आवक घडल्याने दरामध्ये तेजी पाहायला मिळत आहे. सध्या जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हिरव्या रंगाच्या मोसंबीला 20 हजार ते 25 हजार रुपये प्रति टन असा दर मिळत आहे. तर पिवळसर झालेल्या मोसंबीला 15 हजार ते 22 हजार रुपये प्रति टन असा दर मिळत आहे. जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोसंबी दराची स्थिती काय आहे, याचबाबत लोकल18 चा विशेष आढावा.

advertisement

मोसंबीचा जिल्हा म्हणून जालना जिल्ह्याची ओळख आहे. जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मोसंबी बागायतदार शेतकरी असल्याने मोसंबीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. सध्या आंबिया बहाराची मोसंबी जालना मोसंबी मार्केटमध्ये विक्रीस येत आहे. मोसंबीची आवक ही कमी झाल्याचे पाहायला मिळते आहे. महिनाभरापूर्वी 700 ते 800 टन आवक दररोज मार्केटमध्ये यायची. आता हीच आवक 200 ते 250 टनापर्यंत आली आहे. आवक कमी झाल्याने मोसंबीची दर हे 20 ते 25 हजार रुपये प्रति टन या दरम्यान स्थिर आहेत. तर पिवळसर झालेल्या हलक्या दर्जाच्या मोसंबीला 15 ते 22 हजार रुपये प्रति टन असा दर मिळत आहे.

advertisement

नवरात्री विशेष : मुंबईत रेल्वेकडून राबवली जातेय नारीशक्ती नवदुर्गा मोहीम, नेमकी काय आहे ही संकल्पना?

नवरात्र उत्सवाचा काळ सुरू असल्याने उत्तर भारतातील जयपूर, लखनऊ, दिल्ली आग्रा अशा शहरांमधून मोसंबीला मोठी मागणी आहे. पाणीदार आणि हिरव्या रंगाची मोसंबी टिकाऊ असल्याने दर जास्त आहेत. तर पिवळसर मोसंबी लवकर खराब होत असल्याने दर कमी असल्याचे जालना मोसंबी अडत्या असोसिएशनचे अध्यक्ष नाथा पाटील घनगाव यांनी सांगितले.

advertisement

दिवाळीपर्यंत मोसंबीचे दर असेच किंवा काहीशी कमी होऊ शकतात. मात्र, दिवाळीनंतर दरात सुधारणा पाहायला मिळू शकते, असेही घनघाव यांनी सांगितले. मात्र, ज्या शेतकऱ्यांची मोसंबी हिरव्या रंगाची आहेत तेच भाव वाढीची प्रतीक्षा करू शकतात. तर ज्यांच्या बागेतील मोसंबीचा रंग पिवळा झाला आहे त्यांनी लवकर मोसंबी तोडणी करून त्याची विक्री करावी, यामुळे मोसंबीचे संभाव्य नुकसान टळेल, असे आवाहन देखील नाथा पाटील घनगाव यांनी केले आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
नवरात्रीत मोसंबीला मागणी, दरही तेजीत, जालना मार्केटमध्ये नेमकी काय आहे परिस्थिती?, VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल