नवरात्री विशेष : मुंबईत रेल्वेकडून राबवली जातेय नारीशक्ती नवदुर्गा मोहीम, नेमकी काय आहे ही संकल्पना?
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Pratikesh Patil
Last Updated:
nari shakti navdurga campaign - मुंबईत रेल्वेच्या वतीने नारीशक्ती नवदुर्गा मोहीम राबवण्यात आली. नेमकी काय आहे संकल्पना, याचबाबत लोकल18 च्या टीमने घेतलेला हा आढावा.
प्रतिकेश पाटील, प्रतिनिधी
मुंबई - सर्वत्र नवरात्रौत्सव साजरा करण्यात येत आहे. या नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईत रेल्वेच्या वतीने नारीशक्ती नवदुर्गा मोहीम राबवण्यात आली. नेमकी काय आहे संकल्पना, याचबाबत लोकल18 च्या टीमने घेतलेला हा आढावा.
नारीशक्ती नवदुर्गा मोहीम रेल्वेकडून आखण्यात आली आहे. या मोहिमेतअंतर्गत महिला तिकीट तपासनीसची विशेष टीम आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर कार्यरत असणार आहे. या मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. नारी शक्ती नवदुर्गा मोहीममध्ये एकून 51 महिला तिकीट तपासणीस या मोहिमेत सहभागी झाल्या आहेत. याचबरोबर 9 सीआरएफचे जवान या मोहिमेमध्ये सहभागी होणार आहेत. या मोहीम अंतर्गत आतापर्यंत 2 लाखांपेक्षा अधिक रक्कम जमा झाली आहे. तर 765 केसेस रजिस्टर केले गेले आहे.
advertisement
नवदुर्गा मोहीम नवरात्री उत्सवाच्या दरम्यान चालवण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या प्रत्येक रेल्वे स्थानकावर 9 दिवस वेगवेगळ्या स्थानकावर ही मोहीम राबवण्यात येणार आहे. महिला तिकीट तपासणीस करणाऱ्या तेजस्विनी ग्रुपकडून ही मोहीम 9 दिवस राबवली जाणार आहे. यामध्ये विनातिकीट प्रवास करणारे आणि चुकीच्या तिकीटने प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यात येणार आहेत.
advertisement
काल ही मोहीम छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनेशनवर राबवण्यात आली होती. सकाळी 6 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत ही मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेमध्ये 756 प्रवाशांवर केसर रजिस्टर करण्यात आले. तर आतापर्यंत 2 लाख पेक्षा अधिक रक्कम जमा करण्यात आली. यावेळी प्रवाशांनी विना तिकीट प्रवास करू नये, असे आवाहन मध्य रेल्वेचे प्रमुख जनसंपर्क अधिकारी स्वप्निल निला यांच्याकडून करण्यात आले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 08, 2024 1:23 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
नवरात्री विशेष : मुंबईत रेल्वेकडून राबवली जातेय नारीशक्ती नवदुर्गा मोहीम, नेमकी काय आहे ही संकल्पना?