Navratri 2024 : या नवरात्रीत देवी मातेसाठी बनवा दुधीच्या हलव्याचा नैवेद्य, जाणून घ्या, सोपी रेसिपी, VIDEO
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
dudhi halwa receipe - कोकणात देवी आगमनानंतर नैवेद्यासाठी खास एक गोड पदार्थ बनवला जातो. हा पदार्थ म्हणजे दुधी हलवा. हा दुधी हलवा नेमका कसा बनवला जातो, याची रेसिपी काय आहे, हेच आपण आज जाणून घेऊयात.
साक्षी पाटील, प्रतिनिधी
ठाणे - नवरात्रोत्सवाला सुरुवात झाल्यानंतर सर्वत्र उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण आहे. अनेकांच्या घरी देवीचे आगमन झाले आहे. कोकणात देवी आगमनानंतर नैवेद्यासाठी खास एक गोड पदार्थ बनवला जातो. हा पदार्थ म्हणजे दुधी हलवा. हा दुधी हलवा नेमका कसा बनवला जातो, याची रेसिपी काय आहे, हेच आपण आज जाणून घेऊयात.
दुधी हलवा बनवण्यासाठी साहित्य -
एक मोठा दुधी, एक वाटी मावा, साखर, दूध, वेलची पावडर आणि खसखस.
advertisement
कृती - सर्वप्रथम दुधी स्वच्छ धुऊन किसून घ्यावे. त्यामध्ये असणाऱ्या बिया बाजूला काढून घ्या. मग गॅस सुरू करून पातेल्यात किसलेला दुधी टाका आणि 10 मिनिटे झाकण ठेवून थोडे शिजवून घ्यावे. आता या दुधीमध्ये अर्धा ग्लास दूध टाका. 5 मिनिटे दुधामध्ये दुधी शिजली की मग त्यामध्ये मावा टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यावा.
advertisement
त्यानंतर मग त्यामध्ये साखर, वेलची पावडर आणि खसखस टाकावे. त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून 5 मिनिटे शिजवून घ्यावे. अशा पद्धतीने तुमचा गोड गोड दुधी हलवा तयार होईल.
view commentsLocation :
Thane,Maharashtra
First Published :
Oct 08, 2024 12:00 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
Navratri 2024 : या नवरात्रीत देवी मातेसाठी बनवा दुधीच्या हलव्याचा नैवेद्य, जाणून घ्या, सोपी रेसिपी, VIDEO








