Jalna News : पीक विम्याची मिळणार अग्रीम भरपाई, थेट खात्यावर जमा होणार रक्कम, जिल्हाधिकाऱ्यांनी दिले हे आदेश
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
good news for farmers - हवामानावर आधारीत पीक विम्याची रक्कम देण्याची प्रणाली लागू करण्यात आलेली आहे. यानुसार, शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पीक विमा कंपनीस दिवाळीपूर्वी एकूण विम्याच्या मदतीच्या 25 टक्के अग्रीम भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शासनाकडून निधी प्राप्त झाल्यानंतर ती रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली.
नारायण काळे, प्रतिनिधी
जालना - जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जालना जिल्ह्यात शेती पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 25% भरपाई अग्रिम स्वरूपात देण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. कृष्ण पांचाळ यांनी दिले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी यंदा गोड होणार आहे.
यंदा खरीप हंगामात अतिवृष्टी, ढगफुटी व पूर परिस्थितीमुळे सोयाबीन, कापूस, तूर, मूग व उडीद या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे नुकसाग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरिपाच्या पीक विमाधारक शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रीम विमा रक्कम देण्याचे आदेश जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, अग्रीम 412.30 कोटींची रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत.
advertisement
पंतप्रधान पीक विमा योजनेतील मध्यम हंगाम प्रतिकूल परिस्थिती या जोखीम बाबीअंतर्गत जिल्ह्यातील सर्व मंडळांतील पीक विमाधारक शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रीम विमा रक्कम देण्याचे आदेश जिल्हाधिकारी युनिव्हर्सल सोंपो जनरल इन्शुरन्स कंपनीस पीक विमा देण्यात आलेले आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पीक विम्याच्या एकूण नुकसान भरपाईपैकी 25 टक्के अग्रीम रक्कम देण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांना रब्बीची पेरणी करण्यासाठी मदत मिळणार आहे.
advertisement
जालना जिल्ह्याचे जून ते सप्टेंबरदरम्यान सरासरी पर्जन्यमान 603.1 इतके आहे. सन 2024-25 मध्ये 812.4 मिमी इतका पाऊस पडलेला आहे. यामुळे सरासरीच्या तुलनेत 134.9 टक्के पाऊस जास्त झालेला आहे. जालना जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात सरासरी 141.8 मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे. यावर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टी, ढगफुटी व पूर परिस्थितीमुळे खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, फळपिकांचे मोठे नुकसान झालेले आहे.
advertisement
या काळात पीक विमा कंपनीकडे 4 लाख 87 हजार 834 पूर्वसूचना प्राप्त झालेल्या आहेत. मुसळधार पावसामुळे 2 लाख 55 हजार 519 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झालेले आहे. यात 2 लाख 82 हजार 538 शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालेले असल्याचे विमा कंपनीने सर्वेक्षणात नोंद केलेले आहे. यानुसार, 412.30 कोटी रकमेची नुकसान अनुदानाबाबतची मागणी शासनाकडे करण्यात आलेली असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षकांनी दिली. नुकसानीचा अहवाल प्रशासनाकडून राज्य सरकारकडे सादर करण्यात आलेला आहे.
advertisement
थेट खात्यात जमा होणार मदत -
हवामानावर आधारीत पीक विम्याची रक्कम देण्याची प्रणाली लागू करण्यात आलेली आहे. यानुसार, शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पीक विमा कंपनीस दिवाळीपूर्वी एकूण विम्याच्या मदतीच्या 25 टक्के अग्रीम भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शासनाकडून निधी प्राप्त झाल्यानंतर ती रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली.
Location :
Jalna,Jalna,Maharashtra
First Published :
October 08, 2024 11:29 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
Jalna News : पीक विम्याची मिळणार अग्रीम भरपाई, थेट खात्यावर जमा होणार रक्कम, जिल्हाधिकाऱ्यांनी दिले हे आदेश