TRENDING:

शेतकऱ्याच्या पोरानं नाव कमावलं, MPSC परिक्षेत मिळवली क्लास वन पोस्ट, जालन्याच्या दिपकची प्रेरणादायी कहाणी!

Last Updated:

mpsc success story - महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेचा निकाल नुकताच लागला. यामध्ये जाफराबाद तालुक्यातील अकोला देव येथील रहिवासी असलेला दीपक बाबूराव सवडे हा महाराष्ट्रातून 29व्या स्थानी आला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नारायण काळे, प्रतिनिधी
advertisement

जालना - स्पर्धा परीक्षांमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थी नेहमीच बाजी मारत असतात. त्याची झलक पुन्हा एकदा जालन्यातील दीपक सवडे या तरुणाने दाखवून दिली आहे. अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा असलेला दिपक आता क्लासवन अधिकारी होणार आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेचा निकाल नुकताच लागला. यामध्ये जाफराबाद तालुक्यातील अकोला देव येथील रहिवासी असलेला दीपक बाबूराव सवडे हा महाराष्ट्रातून 29व्या स्थानी आला. आता तो लवकरच मुख्य कार्यकारी अधिकारी (नगरपरिषद) किंवा उपमुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद) या पदावर विराजमान होणार आहे.

advertisement

अकोला देव येथील रहिवाशी असलेल्या असलेल्या बाबूराव सवडे यांचा मुलगा दीपक सवडे याचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत, तर माध्यमिक शिक्षण गावातीलच जाणता राजा हायस्कूलमध्ये झाले. यानंतर त्याने बी. टेक.ची पदवी घेतली. पदवीच्या शिक्षणानंतर दीपकने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. तो यूपीएससीसोबत एमपीएससीची परीक्षाही देऊ लागला. एमपीएससीच्या दुसऱ्या प्रयत्नात त्याला हे यश मिळाले आहे.

advertisement

कांद्यावर करपा, फुलकिडीचा धोका, शेतकऱ्यांनी नेमकं काय करावं, कृषी विभागाने सांगितला महत्त्वाचा सल्ला

आपण स्पर्धा परीक्षेत टिकू शकत नाही. हा न्यूनगंड ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मनातून काढून टाकावा. आपले ध्येय निश्चित करून अभ्यासात सातत्य ठेवले तर कोणतेही यश तुमच्यापासून दूर नाही. मी पदवी करीत असतानाच यूपीएससीचे ध्येय बाळगले होते. या परीक्षेत सध्या स्पर्धा खूप वाढल्याने विद्यार्थ्यांनी प्लॅन बी तयार ठेवावा. कुठलेही महागडे क्लासेस न लावता अभ्यासातील सातत्यावर हे यश संपादन केले. या यशात आई-वडिलांची प्रेरणा, शिक्षक व मित्रांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले, अशी प्रतिक्रिया दीपक सवडे या तरुणाने व्यक्त केली.

advertisement

दरम्यान, अकोला देवमध्ये ही वार्ता येताच ग्रामस्थांनी एकच जल्लोष केला. शुक्रवारी गावातील शिक्षक व ग्रामस्थांनी दीपकच्या घरी जाऊन त्याचे वडील बाबूराव सवडे व आई नंदा सवडे यांचा सत्कार केला. त्याच्या या यशाचे परिसरातील नागरिकांमधून कौतुक केले जात आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
शेतकऱ्याच्या पोरानं नाव कमावलं, MPSC परिक्षेत मिळवली क्लास वन पोस्ट, जालन्याच्या दिपकची प्रेरणादायी कहाणी!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल