TRENDING:

एकेकाळी होता हॉटेल कामगार, आज झाला हॉटेल मालक, दिवसाला 2 हजारांचा नफा, जालन्यातील व्यक्तीच्या जिद्दीची कहाणी!

Last Updated:

hotel business success story - एकेकाळी एमआयडीसीमध्ये काम करून उपजीविका करणारे नंदकिशोर हे काही दिवस हॉटेलमध्येही कामगार म्हणून कामाला होते. मात्र, आता त्याचे स्वतःचे हॉटेल असून त्यांच्या हाताखाली 4 जण कामाला आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नारायण काळे, प्रतिनिधी
advertisement

जालना - सध्या नोकरीच्या तुलनेत व्यवसाय करण्याकडे तरुणांचा कल वाढत आहे. त्यामुळे लहान असो किंवा मोठा असो, स्वतःच्या व्यवसाय करून अनेक तरुण चांगला नफा कमवत आहेत. आज अशाच एका व्यक्तीची कहाणी आपण जाणून घेणार आहोत, जे एकेकाळी एमआयडीसी कामगार होते पण आज त्यांचे स्वत:चे हॉटेल असून ते आपल्या या व्यवसायातून चांगली कमाई करत आहेत.

advertisement

नंदकिशोर झारकंडे असे या व्यक्तीचे नाव आहे. ते जालना शरहातील गांधीनगर भागातील रहिवासी आहेत. एकेकाळी एमआयडीसीमध्ये काम करून उपजीविका करणारे नंदकिशोर हे काही दिवस हॉटेलमध्येही कामगार म्हणून कामाला होते. मात्र, आता त्याचे स्वतःचे हॉटेल असून त्यांच्या हाताखाली 4 जण कामाला आहेत.

दीड एक शेतीतून तब्बल 6 लाखांचं उत्पन्न, बीडच्या शेतकऱ्यानं केली कमाल!

advertisement

नंदकिशोर यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे. घरची परिस्थिती सामान्य होती. त्यात वडील ज्यूस सेंटर चालवतात. त्यामुळे शिक्षणानंतर उपजीविकेसाठी त्यांनी 3 ते 4 वर्ष जालन्यातील एमआयडीसीत 350 रुपये प्रति हजेरीवर काम केले. यानंतर शहरातीलच एका हॉटेलमध्येही त्यांनी 3-4 वर्ष काम केले. यावेळी कामगार म्हणून मालक जे सांगेल ते काम करावे लागायचे. त्यामुळे आपणही मालक व्हावे, असे त्यांना वाटायला लागले.

advertisement

याच विचारातून त्यांनी 40 ते 50 हजार रुपयांची बचत करून जालना शहरातील मंठा चौफुली येथे छोटेसे चहा नाश्ता सेंटर सुरू केले. यामध्ये सुरुवातीला त्यांना लोकांचा प्रतिसाद कमी प्रमाणात मिळाला. मात्र, हळूहळू लोकांचा प्रतिसाद वाढत गेला. आता दररोज ते 4 ते 5 हजार रुपयांची त्याची कमाई करत आहेत. यामध्ये जागेचे भाडे आणि 4 मजुरांना जाणारा पगार वगळून त्यांना दिवसाला 2 हजार रुपयांचा नफा होत आहे.

advertisement

कोणते पदार्थ मिळतात -

या कामांमध्ये त्याची पत्नीदेखील त्याला खंबीरपणे साथ देत आहे. मंठा चौफुली परिसरात अनेक मोठमोठे हॉस्पिटल आहेत. या हॉस्पिटल मधील रुग्णांचे नातेवाईक चहा, नाश्ता आणि जेवण करण्यासाठी या हॉटेलवर येतात. नाश्त्यासाठी समोसा, ब्रेड वडा, वडापाव तर जेवणासाठी राइसप्लेट आणि वेगवेगळ्या भाज्या ते बनवून देतात. त्यांचा हा हॉटेल व्यवसाय आता चांगलाच भरभराटीस आला असून महिन्यासाठी ते 50 ते 60 हजारांचा नफा कमावत आहेत.

काय म्हणाले नंदकिशोर झारकंडे -

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
45 वर्षांपासून जपलीये तिच चव, सोलापुरातील फेमस शिक कढई, एकदा खाल तर पुन्हा याल
सर्व पहा

लोकल18 शी बोलताना नंदकिशोर झारखंडे म्हणाले की, संघर्ष म्हणाल तर सांगण्यासारखे खूप आहे. एमआयडीसीत काम करणे असो किंवा हॉटेलमध्ये काम करणे असो, पण कधीतरी मनाला वाटायचे की आपणही मालक व्हावे, म्हणून ही हॉटेल सुरू केली. आता आपले चांगले चालू आहे. 4-5 लोक हाताखाली आहेत. दिवसाला 2 हजार रुपये कसेही उरतात. माझी पत्नीही मला मदत करते. कोणत्याही कामात लाज न बाळगता व्यावसायिक दृष्टिकोनातून व्यवसाय केल्यास तो फायदेशीर ठरतो, या शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
एकेकाळी होता हॉटेल कामगार, आज झाला हॉटेल मालक, दिवसाला 2 हजारांचा नफा, जालन्यातील व्यक्तीच्या जिद्दीची कहाणी!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल