'पाऊस उघडल्यावर जाऊ आपण बाळा'
मागील काही दिवसांपासून नैतिक आणि त्याच्या मित्रांनी तुळजापूरला दर्शनासाठी जाणार होते. नैतिकने याबाबत आपल्या आई-वडिलांना वारंवार विनंती केली, मात्र त्यांनी त्याला जाण्यास स्पष्ट नकार दिला. सध्या राज्यभरात पावसाची परिस्थिती असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव पालकांनी ही परवानगी दिली नाही. याचा पोराला राग आला. आईने नैतिकला समजावण्याचा प्रयत्न केला की, "पाऊस उघडल्यावर आपण सर्वजण एकत्र दर्शनासाठी जाऊ," मात्र नैतिक मित्रांसोबत जाण्याचा हट्ट धरून बसला होता.
advertisement
आई भुईमुगाच्या शेंगा तोडायला गेली
अखेर आई-वडिलांनी परवानगी नाकारल्यानंतर नैतिकने शनिवारी, 27 सप्टेंबर रोजी हे दुर्दैवी पाऊल उचललं. शनिवारी नैतिकची आई शेतात भुईमुगाच्या शेंगा तोडण्याच्या कामात व्यस्त होती, तर वडीलही अन्य कामासाठी घराबाहेर होते. त्याचे आजोबा गावातील एका अंत्यविधीसाठी गेले होते. ही संधी साधून नैतिकने घरात गळफास घेतला. त्यावेळी नैतिकने टोकाचं पाऊल उचललं.
आजोबा अंत्यविधीहून परतले अन्...
दरम्यान, आजोबा अंत्यविधीहून परतले, तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद होता. त्यांनी बाहेरून पाहिले असता, नैतिकने गळफास घेतल्याचे धक्कादायक दृष्य त्यांना दिसले. तात्काळ नातेवाईकांच्या मदतीने नैतिकला खाली उतरवून तातडीने दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केलं. एका निष्पाप मुलाने घेतलेल्या या टोकाच्या निर्णयामुळे सोनवणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.