मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीत उपचार घेण्याची तयारी दर्शवलीय. सरकारी डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांनी सलाईनसुद्धा घेतले. जरांगे पाटील म्हणाले की, कोर्टाचा मान ठेवून मी सलाईन लावलंय. आता सगे सोयऱ्यांचा निर्णय घ्या. अधिवेशन सुरू झालं आहे. गॅझेट अंमलात आणा. तसंच आमरण उपोषणाबाबतचा निर्णय आज पाच वाजता घेणार आहे.
अंबड तालुक्यात संचार बंदी लागू केली आहे. तर दुसरीकडे एसटी बस पेटवल्याची घटना घडलीय. यावरून बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, राज्यात शांततेत रास्ता रोको झाला. जाळपोळ उद्रेकाच्या घटनांचे समर्थन नाही. आज इंटरनेट बंद ठेवलं आहे. पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आले आहेत. आमचा हक्क नाही का मुंबईला मागणीसाठी जाण्याचा? सगे सोयरे लागू करा, नाराजी लगेच मागे घेतो असंही जरांगेंनी म्हटलं.
advertisement
Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंनी का घेतला युटर्न? आता पुढे काय करणार
एक एक मावळा महत्वाचा आहे. हेच मावळे पुढे कामी येईल आणि आम्ही किल्ला जिंकूच. आम्ही कुठे म्हणालो मुख्यमंत्री यांनी इगो ठेवला. आम्ही नेहमी शिंदेच आम्हाला आरक्षण देणार म्हणत होतो. फडणवीस बाबतही मी कधी बोललो नव्हतो. तुम्ही डाव बंद करा. पुन्हा अंतरवाली करण्याचा प्रयत्न करू नका असे म्हणत जरांगे पाटलांनी इशारा दिला.
तुमच्या हातात सगळे असून हवा तो तपास करा. मला आधी म्हणाले शरद पवारचा आहे. नंतर म्हणाले उद्धव ठाकरे, त्यानंतर राज ठाकरे यांचा आहे. पण काहीच निघत नाही यातून, हे फक्त आरोप आहेत. सरकारला शब्द बदलू शकत नाही. तर मराठे उलटतील. आजही दोघांना संधी आहे असंही जरांगे पाटील म्हणाले.
मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी सरकारकडे तीन मागण्यासुद्धा केल्या आहेत. आमचे आम्हाला आरक्षण द्या, आमची नाराजी जाईल. आंदोलकांवर करण्यात आलेले गुन्हे मागे घ्या. गॅझेट घ्या. सगेसोयरे लागू करा अशा तीन मागण्या त्यांनी केल्या आहेत. या मागण्या पूर्ण झाल्यास आमची नाराजी जाईल असं जरांगे पाटील म्हणाले.
